नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आहेत. पुरुष आतापर्यंत कंडोमचा वापर करतात. मात्र आता लवकरच पुरुषांसाठीदेखील गर्भनिरोधक येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अनेक अभ्यासातून असं दिसून आले आहे की पुरुषांमध्ये संप्रेरक गर्भनिरोधक वापरुन अनियोजित गर्भधारणा रोखली जाऊ शकते. एका सर्वेक्षणानुसार पुरुषांनाही असं गर्भनिरोधक औषध हवं आहे. ब्रिटीश पेपरमधील अहवालानुसार, 52 टक्के पुरुष दररोज गर्भनिरोधक औषध घेऊ इच्छितात. myupchar.com च्या नुसार, जगभरातील बरेच वैज्ञानिक पुरुषांसाठी गर्भनिरोधक औषध बनवण्याच्या दिशेनं काम करत आहेत. यात मिनेसोटा युनिव्हर्सिटीचे पदवीधर विद्यार्थी जिलियन केझर विशेषत: कार्यरत आहेत. पुरुषांमध्ये संप्रेरक इंजेक्शन प्रभावी गर्भनिरोधक म्हणून वापरले जाऊ शकतं. अमेरिकन संशोधकांनी त्यांच्या संशोधनात 270 पुरुषांवर या संप्रेरक इंजेक्शनचा उपयोग केला, त्यापैकी केवळ चार पुरुषांच्या पत्नी या काळात गर्भवती झाल्या. म्हणूनच संप्रेरक इंजेक्शन्स 96 टक्के यशस्वी असल्याचं मानलं जातं. पण याचे काही दुष्परिणामही समोर आले आहेत. काही लोकांच्या चेहऱ्यावर डाग उमटल्याच्या तक्रारी आल्या आहेत तर काही लोक आजारीही पडले. हे वाचा - फक्त फूड प्रोडक्ट नाही तर ब्युटी प्रोडक्ट आहे बेकिंग सोडा; असा करा वापर myupchar.com च्या नुसार, अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ आता कोणताही दुष्परिणाम न होता पुरुषांमध्ये शुक्राणूंचं उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंचे उत्पादन सतत चालू असते. जर शास्त्रज्ञांना यशस्वी पुरुष गर्भनिरोधक बनवण्यासाठी शूक्राणूंची संख्या कमी करण्यावर भर दिला जातो आहे. या प्रयोगाशी संबंधित अहवाल वैद्यकीय एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. हे वाचा - बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय शेफील्ड विद्यापीठाचे पुरुष विज्ञान प्राध्यापक एलन पेसी यांनी सांगितलं, पुरूष गर्भनिरोधकाचं व्यावसायिक उत्पादन अनेक कारणांमुळे अद्याप सुरू झालेलं नाही. जगभरात चालू असलेल्या इतर प्रयोगांविषयी बोलाल तर त्यातही वजन वाढणं, कोलेस्ट्रॉलची पातळी खूपच कमी होणं असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. तरी लवकरच अशी औषधं बाजारात येतील. शिवाय 20 टक्के पुरुषांवर हे औषध प्रभावी ठरणार नाही असा दावाही केला जातो आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - निरोध: प्रकार, वापर, कसे घालावे न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._