मुंबई, 15 सप्टेंबर : स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असत. जेव्हा आपण घर घेतो किंवा आपल्या आधीच्या घरालाच नवा लूक देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सर्वात जास्त महत्वाचा असतो घराचा रंग. तुमच्या घराचा रंग घर सुंदर तर बनवतोच परंतु हा घराचा रंग तुमचे व्यक्तिमत्वही दर्शवतो. त्यामुळे घराचा रंग निवडताना आणि घराला रंग देताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणारो ज्यामुळे तुमचे घर सुंदर तर दिसेलच घराचा रंगही दीर्घकाळ टिकेल. पेंटची योग्य निवड आवश्यक झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, आपण जेव्हा घराला पेंट करतो म्हणजेच रंग देतो. त्यानंतर घराची चमक काही काळ टिकते आणि नंतर हळूहळू घर पुन्हा जाण्यासारखे दिसू लागते. याचे कारण बऱ्याचदा योग्य पेंट न निवडणे असते. त्यामुळे आपल्या घराला रंग देण्यासाठी योग्य पेंट निवडणे आवश्यक आहे. शक्यतो घरात असा रंग वापरावा जो त्यावर डाग पडल्यानंतर पाण्याने सहज पुसता येईल आणि तरीही त्याचाही चमक कायम राहील. असा रंग बराच काळ टिकतो.
Vastu Tips : ही मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, जाणून घ्या यासंबंधित फेंगशुई टिप्सयोग्य रंग निवडा आपल्या घराचा रंग आपले व्यक्तिमत्व दर्शवतो. त्यामुळे घराचा रंग निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला आणि घराच्या फर्निचरला मिळता जुळता निवडायला हवा. घरातील जोडपी, वयस्कर लोक, लहान मुले यांना साजेसा त्यांच्या रूमचा रंग असायला हवा. याशिवाय घराच्या आकारावरूनही रंगांची निवड करता येते. भिंतीच्या ओलेपणावर करा उपाय पावसाळ्यामध्ये घराच्या भिंती ओल्या होतात आणि त्याला एका ठिकाणी ओलावा लागल्यानंतर तो वाढत जातो. ओलसर ठिकाणी रंग हळूहळू खराब होत जातो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे योग्य ठरते. घरात रंग देण्यापूर्वी बाजारात सहज उपल्बध असणारे सीलंट तुम्ही वापरू शकता. हे तुम्ही पेंट्समध्ये मिक्स करू शकता. तसेच या ओलसरपणाच्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही भिंतीवर पुटीही करून घेऊ शकता. Vastu: घरासमोर अशा गोष्टी बिलकूल असू नयेत; दारिद्र्य वाढतं, नाही मिळत सुख-शांती खेळती हवा असणे गरजेचे रंग देताना खोली हवेशीर ठेवा. त्यामुळे रंग लवकर कोरडा होतो. अशा वेळी दार-खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पावसाळी किंवा ओलसर हवामानात जर तुम्ही घराला रंग देत असाल. तर रंग कोरडा होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो.