नवी दिल्ली, 21 मे : अॅक्टीव नसल्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे लहान वयातच अनेक मुले लठ्ठ होत आहेत. चाइल्डहुड ओबेसिटी रिपोर्टनुसार (Childhood Obesity Report) 5 ते 19 वयोगटातील चीनमध्ये 6.19 कोटी आणि भारतात 2.75 कोटी मुले लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. तर एनसीडी रिस्क फॅक्टर कोलॅबोरेशननुसार, जास्त वजन असलेल्या मुलांचा एकूण संख्येत वाटा जास्त आहे. 2030 पर्यंत लठ्ठ मुलांची संख्या 400 दशलक्षांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत मुलांमधील वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे (Childhood Obesity) आहे. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, फोर्टिस हॉस्पिटल, नोएडाचे अतिरिक्त संचालक आणि बालरोगतज्ञ डॉ. आशुतोष सिन्हा म्हणतात की, आजकाल लहान मुलांची शारीरिक हालचाल कमी झाली असून ते तासनतास मोबाईल गेम आणि व्हिडिओ गेम खेळतात. यासोबतच सतत काही ना काही खात राहणे, हे देखील मुलांमध्ये वजन वाढण्याचे एक मोठे कारण आहे. लहान वयातच मुलांमध्ये सांधेदुखी, पाठदुखी, बद्धकोष्ठता आदी त्रास वाढत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना फास्ट फूडपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या आहाराची काळजी कशी घ्यावी? डॉ. आशुतोष सिन्हा यांच्या मते, मुलांनी जास्त आग्रह केला तर महिन्यातून एकदाच हेल्दी फास्ट फूड जसे पिठाचा पिझ्झा, भरपूर भाज्या घालून नूडल्स, पास्ता, मॅकरोनी किंवा बर्गर बनवून खाईला देऊ शकता, पण फक्त संतुलित प्रमाणात द्या. मुलांना शक्यतो फळे जास्त देण्याचा प्रयत्न करा. हे वाचा - भारतात Omicron BA.4 चा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ; किती घातक आहे हा स्ट्रेन? मुलांच्या खाण्याची दिवसाची सुरुवात प्रथिने समृध्द असलेल्या अंड्यानी करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे कोणताही दबाव न टाकता पोषक आहार खाण्यास प्रवृत्त करा. मुलांमध्ये निरोगी आहाराची सवय लावण्यासाठी तुम्ही तुमचा आहारही निरोगी ठेवावा. बॉडी मास इंडेक्स नियंत्रित करण्यासाठी मुलांसोबत माउंटन क्लाइंबिंग, वॉक डान्स आणि योगा देखील करता येतो. हे वाचा - Relationship Tips: ‘या’ 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)