JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chandra Grahan 2022: 16 मे रोजी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी चुकूनही करू नयेत ही 5 कामं

Chandra Grahan 2022: 16 मे रोजी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी चुकूनही करू नयेत ही 5 कामं

श्री कल्लाजी वैदिक युनिव्हर्सिटीच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी सांगितले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan) 16 मे रोजी होणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, राहू आणि केतू पौर्णिमेच्या रात्री चंद्राला ग्रास करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी चंद्राला ग्रहण लागतं. चंद्र देवावर आलेल्या या संकटकाळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्राचा संबंध भावना, प्रकृती, मन इत्यादींशीही आहे. जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा लोकांना त्याबाबतीत त्रास होतो, त्यामुळे या काळात देवाची पूजा करावी असे म्हटले जाते. चंद्रग्रहणाच्या (Lunar Eclipse) काळात गर्भवती महिलांना काही कामे करण्यास मनाई आहे. श्री कल्लाजी वैदिक युनिव्हर्सिटीच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी सांगितले आहे. चंद्रग्रहण 2022 वेळ आणि ठिकाण प्रारंभ वेळ: 16 मे, सोमवार, 07:58 AM बंद होण्याची वेळ: 16 मे, सोमवार रात्री 11.25 वाजता सुतक काळ: हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक काळ वैध राहणार नाही. ते कुठे दिसेल : अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, उत्तर-दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पश्चिम युरोप, मध्य-पूर्व. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी ही कामं करू नयेत - 1. संपूर्ण चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडणे निषिद्ध आहे. ग्रहणाचा दुष्परिणाम तिच्यावर आणि तिच्या बाळावरदेखील होण्याची भीती असते. 2. चंद्रग्रहणाच्या काळात खाण्यास मनाई आहे. ग्रहणामुळे अन्न दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुळशीची पाने आणि गंगाजल अन्नात टाकून घ्या. हे वाचा -  जाणून घ्या शुक्र प्रदोष व्रताची कथा आणि महत्व; भगवान शिवाचा राहतो नेहमी वरदहस्त 3. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी धारदार वस्तू जसे की सुई, चाकू इत्यादी वापरू नये. 4. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी शक्यतो झोपू नये. या दरम्यान, आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करा किंवा हनुमान चालीसा किंवा दुर्गा चालीसा पाठ करा. हे वाचा -  16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, या 5 राशीच्या लोकांनी आतापासूनच राहा सावध 5. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या