JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chanakya Niti : सतत पराभव होत असेल तर ही गोष्ट करा, यश नक्की मिळेल

Chanakya Niti : सतत पराभव होत असेल तर ही गोष्ट करा, यश नक्की मिळेल

चाणक्य नीतीमध्ये चांगले आयुष्य आणि यश मिळवण्यासाठी काय करावे आणि कोणत्या गोष्टी करु नये, हे देखिल सांगितले गेले आहे. त्यामुळे जे लोक आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असतात, ते नक्कीच याला फॉलो देखील करतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 नोव्हेंबर : चाणाक्य नीतिला अनेक लोक फॉलो करतात. यामध्ये दिले गेलेले सल्ले बरेच लोक आपल्या आयुष्यात आत्मसाद करतात. खरंतर आचार्य चाणक्य यांनी आपल्या चतुर धोरणाच्या जोरावर अलेक्झांडरचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांची चाणक्य नीति जगभरात ओळखली जाते. चाणक्य नीती मध्ये चांगले आयुष्य आणि यश मिळवण्यासाठी काय करावे आणि कोणत्या गोष्टी करु नये, हे देखिल सांगितले गेले आहे. त्यामुळे जे लोक आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असतात, ते नक्कीच याला फॉलो देखील करतात. हे ही वाचा : Chanakya Niti : पुरुषांच्या ‘या’ वाईट सवयींपासून इम्प्रेस होतात बहुतांश महिला चाणक्य म्हणतो की ज्यांचा फक्त विजयावर विश्वास असतो, शेवटी यश त्यांच्याच असते. तसेच, जेव्हा सतत पराभव किंवा निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा चाणक्याची ही एक गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टीचा विचार केल्यावर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. ज्या लोकांच्या हातात निराशा आहे किंवा जे लोक आपल्या यशा पर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांसाठी चाणक्य नीतिमध्ये एक मंत्र दिला आहे. चाणक्य हे त्याच्या अध्यायात सिंहाचे उदाहरण देऊन समजावून सांगतात की ज्याप्रमाणे सिंह आपले शिकार मिळवण्यासाठी पूर्ण एकाग्रतेने प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे माणसाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रतेने प्रयत्न केले पाहिजेत. त्यात जर माणसाचं लक्ष दुसरीकडे वळवलं तर संधी आणि यश दोन्ही गमावून बसेल आणि पुन्हा ते मिळवण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागेल. एकाग्रता माणसाच्या यशाचे माप ठरवते. सिंह आपली सर्व शक्ती आपल्या शिकारीवर झेलण्यासाठी लावतो, त्याचप्रमाणे मनुष्याने प्रामाणिक राहून आपल्या कामासाठी कठोर परिश्रम केले तरच त्याला यश प्राप्त होते.

माणसाने सुरुवातीपासूनच पूर्ण उर्जेने काम केले, तर पुढचा मार्ग सुगम होईल. त्याचबरोबर सुरुवातीला आळशीपणा दाखवला तर अपयशी ठरणार हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या