चाणक्य नीति : आनंदी आयुष्य जगण्यासाठी 'या' गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा

देखणी स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. पण मनाने सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्यभर आनंद देते.

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होणं आरोग्यदायी असलं तरी, हे लक्षात ठेवा की लोक आरोग्यदायी झाडाला पहिलं कापतात

कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, कारण काहीही झालं तरी ते त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत

सोन्याचं परीक्षण करण्यासाठी त्याला अग्नीत जाळलं जातं. त्याचप्रकारे, व्यक्तींवर होणारे आरोप हे त्याची परीक्षा घेतात.

वाईट मित्र, वाईट बायको आणि वाईट शिष्यांसोबत राहण्याऐवजी एकटं राहणं केव्हाही चांगलं. कारण ते आपल्या आयुष्याचा नाश करतात.

आपली समस्या इतरांना सांगू नका. कारण लोक आपल्या कमजोरपणाचा आनंद घेतात, त्याच्यावर हसतात आणि त्याचा फायदा घेतात.

आयुष्यातील काही गोष्टी शिकताना, व्यवसाय करताना आणि जेवण करताना लाजेला पूर्णपणे सोडलं पाहिजे.

घर, गाडी, कुटुंब, कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत नेहमी आनंदी राहा. परंतू ज्ञानाच्या बाबतीत कधीही संतुष्ट राहू नका.

जो माणूस फक्त खाण्यासाठी तोंड उघडतो, त्याला 100 वर्षाचे सुख एकाच वर्षात मिळते. मौन एक महानशस्त्र आहे. जे युद्ध करुन देखील मिळणार नाही, ते मौनामुळे मिळते.