चाणक्य नीती
मुंबई 13 ऑक्टोबर : आपण नेहमी असे म्हणतो की थोरामोठ्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपल्याला पाळायला हव्यात. खरंतर त्यांचे सल्ले आपल्यासाठी नेहमीच फायद्याचे ठरतात. त्याप्रमाणेच चाणक्य नीतीही आपल्याला व्यवहारीक तसेच इतर ज्ञानही देते. तसेच समाजात वावरताना कसं वागावं, कशावर विश्वास ठेवावा या सगळ्या गोष्टी आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये सांगितल्या जातात. असं बऱ्याचदा होतं की, एखादी महिला किंवा एखादा पुरुष हा समोरच्या व्यक्तींकडे त्यांच्या काही गुणांमुळे आकर्षित होतो. परंतू चाणक्य नीती याबद्दल काही वेगळं सांगते. नीतीनुसार महिला बऱ्याचदा पुरुषांच्या अशा सवयींकडे आकर्षीत होतात. ज्या खरंच चुकीच्या असतात. हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत पणती लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कुठल्या दिशेला असावी ज्योत? आचार्य चाणक्य हे एक समाजशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचे शब्द किंवा शिकवण आजही इतकी प्रभावी आहे की लोक त्यांचा विचार न करता जीवनात लागू करतात. चला जाणून घेऊ चाणक्य नीती व्यस्त राहणे बऱ्याचदा नवरे किंवा पुरुष कामात जास्त व्यस्त असतात आणि महिलांना त्यांची ही सवय आवडते. आनंदी जीवनासाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्वाचे आहे. सहसा प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतू अशा पुरुषाशी लग्न करण तोट्याचं सुद्धा असु शकतं. कारण कामाला महत्व देणाऱ्या पुरुषाचं आपल्या घराकडे फार कमी लक्ष असतं. त्यामुळे ते तुम्हाला फार कमी वेळ देऊ शकतील. खर्च पैशांशिवाय जीवन जगणे खूप कठीण आहे कारण आपल्या सर्वांना आनंद आणि सुविधांची गरज आहे, जे पैशांमुळेच मिळते. बहुतेक जोडपी चांगल्या आयुष्यासाठी खर्च करतात. परंतू रिलेशनशिपमध्ये पती किंवा पुरुष विनाकारण जास्त खर्च करतात आणि अनेक स्त्रिया याला चांगलं देखील मानतात. परंतू हे लक्षात ठेवा की ते चांगलं नाही. भविष्याच्या दृष्टी हे तुम्हाला खूपच अवघड जाईल. हे ही वाचा : Diwali 2022 : का साजरी केली जाते दिवाळी? जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त जास्त चिंता चाणक्या नितीनुसार नवरा-बायकोने एकमेकांबद्दल विचार करणे केव्हाही चांगले. परंतू जास्त चिंता करणं देखील धोक्याचं ठरु शकतं. कारण यामुळे जोडप्याल एक स्वत:ची स्पेस मिळत नाही. तसेच ही चिंता कालांतराने नकोशी वाटू लागते. ज्यामुळे नात्यात फूट पडते. कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे आजच्या काळात बहुतेक लोकांना त्यांच्या लहान कुटुंबात राहायला आवडते. आनंदी कौटुंबिक जीवन जगण्यासाठी लहान कुटुंब हा एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. विवाहानंतर किंवा आधीपासूनच पुरुष आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. महिला या सवयींना खूप चांगलं मानतात. पण चाणक्य नीती सांगते की, स्त्रिया कधी कधी स्वत:ही अशा परिस्थितीचा सामना करू शकतात. जे खूपच वाईट ठरु शकतं.