JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chanakya Niti : अशा माणसांबरोबर मैत्री करताना करा 100 वेळा विचार; नुकसानच होत राहतं

Chanakya Niti : अशा माणसांबरोबर मैत्री करताना करा 100 वेळा विचार; नुकसानच होत राहतं

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति सामान्य माणसाला जरी कठीण वाटल्या तरी, तेच आयुष्यातलं कटू सत्य आहे. धावपळीच्या आयुष्यात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यावेळी संकट उभी राहतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नवी दिल्ली, 13 एप्रिल : आचार्य चाणक्य **(**Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी **(Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)**येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही **(peaceful life)**जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी, चतुर, मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य **(**Kautilya)  म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति सामान्य माणसाला जरी कठीण वाटल्या तरी, तेच आयुष्यातलं कटू सत्य आहे. धावपळीच्या आयुष्यात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यावेळी संकट उभी राहतात.  अशा वेळी चाणक्य नीति आपल्याला मदत करू शकते. हे वाचा -  वजन वाढवणं अवघड काम नाही, आहारात नियमित या 5 गोष्टी घेऊन व्हा धष्टपुष्ट आचार्य चाणक्य यांच्या मते, दुर्बल माणसाबरोबर कधीच मैत्री किंवा जास्त संबंध ठेवू नयेत. चाणक्य सांगतात कमजोर मनाच्या माणसांबरोबर मैत्री घातक ठरते. मैत्री करताना भावनेच्याभरात मैत्री करून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. हे वाचा -  कानातील मळ काढण्यासाठी कधीच वापरू नका ‘या’ गोष्टी; दुखणं वाढण्याची शक्यता बर्‍याचदा असं होतं की, एखादी व्यक्ती कोणत्यातरी कारणामुळे स्वतःहून दुर्बल व्यक्तींबरोबर संबंध जोडतात. त्यांना असं वाटतं की दुर्बल व्यक्तीवर आपण दबाव ठेवू शकतो. दुर्बल माणसं नेहमीच संधिसाधू असतात. वेळ बदलल्यानंतर आपली साथ सोडू शकतात. जेव्हा पण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस मैत्री तोडून दुसऱ्या व्यक्तीशी मैत्री करतात. अडचणीच्या परिस्थितीत दुर्बल लोक मैत्री विसरून जातात आणि कोणत्याही व्यक्तीला धोका देऊ शकतात. हा धोका इतका भयंकर असू शकतो की तुम्ही अडचणीत सापडू शकता. त्यामुळे कधीही कमजोर दुर्बल व्यक्तीबरोबर मैत्री करू नये. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या