मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कानातील मळ काढण्यासाठी कधीच वापरू नका ‘या’ गोष्टी; दुखणं वाढण्याची शक्यता

कानातील मळ काढण्यासाठी कधीच वापरू नका ‘या’ गोष्टी; दुखणं वाढण्याची शक्यता

खरं तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपल्याला कान साफ करण्याची काहीही गरज नसते. मात्र, तरीही कानातील मळ काढावाच लागणार असेल, तर त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी (How to Clean Ear Wax) घेणं गरजेचं आहे.

खरं तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपल्याला कान साफ करण्याची काहीही गरज नसते. मात्र, तरीही कानातील मळ काढावाच लागणार असेल, तर त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी (How to Clean Ear Wax) घेणं गरजेचं आहे.

खरं तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपल्याला कान साफ करण्याची काहीही गरज नसते. मात्र, तरीही कानातील मळ काढावाच लागणार असेल, तर त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी (How to Clean Ear Wax) घेणं गरजेचं आहे.

मुंबई, 11 एप्रिल : आपण बरेचदा पाहिलं असेल की लोक कान साफ करण्यासाठी कितीतरी विचित्र गोष्टी वापरतात. यामध्ये आगपेटीतील काडी, गाडीची चावी, करंगळीचं नख अशा गोष्टींचा समावेश होतो. मात्र, या गोष्टींमुळे कान साफ होण्याऐवजी, कानाला इजा होऊन आतमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका (Mistake You Make While Cleaning Ear) असतो. खरं तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपल्याला कान साफ करण्याची काहीही गरज नसते. मात्र, तरीही कानातील मळ काढावाच लागणार असेल, तर त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी (How to Clean Ear Wax) घेणं गरजेचं आहे.

कानातील मळ खरं तर फायद्याचा -

आपल्या कानातील मळ, म्हणजेच इअर वॅक्स (Ear wax) हा खरं तर कानाच्या आतील भागाचं संरक्षण करत असतो. आपल्या कानाचा पडदा अगदी नाजूक असतो, त्यामुळे तिथपर्यंत धूळ आणि घाणीचे छोटे-छोटे कण पोहोचू नयेत यासाठी हा मळ एका सुरक्षा कवचाप्रमाणे (Benefits of Ear Wax) काम करतो. कानातील मळ हा खरं तर बराच बाहेरच्या बाजूस तयार होतो, आणि कालांतराने तो वाळून, आपल्या जबड्याच्या हालचालींमुळे आपोआपच बाहेरही पडतो. त्यामुळेच डॉक्टर म्हणतात, की कानाची सफाई करण्याची आवश्यकता (Need of Cleaning Ear Wax) नसते. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इअर बड्सही नाहीत सुरक्षित -

कित्येकांना कापूस असलेले इअर बड्स सुरक्षित (Ear Cleaning Mistakes) वाटतात. मात्र, जेव्हा तुम्ही सॉफ्ट कॉटन बड्सने कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा बाहेरील भागात असणारा हा मळ कानाच्या आतील भागात ढकलला जातो. यामुळे कानाच्या नळीमध्ये अडथळा निर्माण होतो. तसंच, जर तुम्ही चावी, कानकोरणं किंवा अन्य टोकदार वस्तूचा वापर केला, तर कानाच्या आत इजा होऊन इन्फेक्शन (Ear Cleaning Mistakes) होण्याचा धोका असतो. एखादी मोठी काडी घेतली असल्यास ती थेट कानाच्या पडद्यालाही इजा पोहोचवू शकते. त्यामुळे कान साफ करताना मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगणं गरजेचं असतं.

हे वाचा - वारंवार पाणी पिऊनही भागत नाहीये तहान; 'या' गंभीर आजाराचं असू शकतं हे लक्षण, वेळीच घ्या खबरदारी

अशा प्रकारे करा कानाची सफाई -

जर तुम्हाला वाटत असेल, की कानात प्रमाणापेक्षा जास्त मळ साचला आहे, आणि सफाईची अत्यंत गरज आहे; तर तुम्ही कानाच्या डॉक्टरकडे जाऊ शकता. घरच्याघरी कानाची सफाई (Ear Cleaning Tips) करणं गरजेचं असल्यास, सर्वांत आधी कानात बेबी ऑईल, मिनरल ऑईल किंवा ग्लिसरिनचे काही थेंब टाका. त्यानंतर काही वेळाने कापडाच्या सहाय्याने कानाची स्वच्छता करा. यासोबतच दुकानात मिळणाऱ्या वॅक्स रिमूव्हल किटच्या मदतीनेही तुम्ही कानाची स्वच्छता (How to Clean Ear Wax Safely) करू शकता.

आपल्या शरीरातील काही नाजूक अवयवांमध्ये कानाचा समावेश होतो. कान साफ करताना केलेली छोटीशी चूक तुम्हाला कायमचं बहिरं करू शकते. त्यामुळेच कानातील मळ काढताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Ear, Health Tips