JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Brain tumor symptoms: डोकेदुखीची ही 2 लक्षणे कधीही दुर्लक्षू नका; ब्रेन ट्यूमरचे आहेत संकेत

Brain tumor symptoms: डोकेदुखीची ही 2 लक्षणे कधीही दुर्लक्षू नका; ब्रेन ट्यूमरचे आहेत संकेत

ब्रेन ट्यूमर हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ब्रेन ट्यूमरची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत, याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोग हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. कॅन्सर हा जीवघेणा आजार असून, जगभरात दर वर्षी लाखो जणांचा या आजारामुळे मृत्यू होतो. कॅन्सरवर केमोथेरपी, रेडिएशन आणि सर्जरीच्या माध्यमातून उपचार केले जातात. कॅन्सरचं वेळेत म्हणजेच अगदी पहिल्या टप्प्यात निदान झालं, तर त्यावर उपचार प्रभावी ठरू शकतात. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये ब्रेन कॅन्सर (Brain Cancer) हा दुर्मीळ समजला जातो. शरीरातल्या कोणत्याही अवयवात ट्यूमर (Tumor) अर्थात गाठ आली की तो कॅन्सरच आहे असा सर्वसामान्य समज असतो. परंतु, सर्वच ट्यूमर कॅन्सर नसतात. ब्रेन ट्यूमरचंही तसंच आहे. परंतु, वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत, तर ट्यूमर कॅन्सरचं रूप घेऊ शकतो. ब्रेन ट्यूमरची काही लक्षणं असतात. डोकेदुखीसारख्या समस्या वारंवार जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपलं शरीर 100 दशलक्ष पेशींनी (Cells) बनलेलं आहे. कॅन्सरचा कोणताही प्रकार हा फक्त पेशींवर परिणाम करतो. कोणताही कॅन्सर एका पेशीपासून किंवा पेशींच्या लहान गटापासून सुरू होतो. मेंदूत गाठ आली तर ती कॅन्सरचीच असते असं नाही. कॅन्सर नसलेल्या ब्रेन ट्यूमरला बेनाइन ब्रेन ट्यूमर (Benign brain tumor) असं म्हटलं जातं. मेंदूत पेशींची असामान्य वाढ झाल्याने ब्रेन ट्यूमर होतो. ब्रेन ट्यूमरचे 130 हून अधिक प्रकार आहेत. मेंदू किंवा पाठीच्या कण्यातल्या कोणत्याही भागात ट्यूमर तयार होऊ शकतो. ज्या पेशींमध्ये असामान्य वाढ होऊन ट्यूमर तयार झाला आहे, त्यावरून त्याला नाव दिलं जातं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेन ट्यूमरचं निदान खूप कठीण असतं. बऱ्याचदा ब्रेन ट्यूमर जीवघेणा ठरू शकतो. या आजाराची लक्षणं संभ्रम निर्माण करणारी असतात. उदाहरणार्थ, वारंवार डोकेदुखी आणि समन्वयाच्या अभावाची समस्या ही ब्रेन ट्यूमरची दोन सामान्य लक्षणं असू शकतात. प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये (Children) ब्रेन कॅन्सरची लक्षणं वेगवेगळी असतात. Pregnancy Tips : गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे? सर्वसामान्यपणे समन्वयाचा अभाव, डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, दृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लहान मुलांमध्ये दिसणारी ब्रेन कॅन्सरची लक्षणं आहेत. तीव्र किंवा सातत्यानं डोकेदुखी, चक्कर येणं, झटका येणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होणं, चव आणि वास समजण्यात अडचणी येणं, हातापायाला मुंग्याला येणं ही ब्रेन कॅन्सरची लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्येदिसून येतात. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तुमचं इम्प्रेशन खराब करतंय? या पद्धतीने वापरा एरंडेल तेल सौम्य ब्रेन ट्यूमर हळूहळू वाढतो आणि तो मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला इजा करतो. ट्यूमर मेंदूला संकुचित करू शकतो आणि त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. मेनिन्जिओमा, वेस्टिब्युलर श्वानोमा आणि पिट्युटरी एडिनोमा हे सौम्य ब्रेन ट्यूमरचे प्रकार आहेत. यात मेनिन्जिओमा (Meningioma) हा ब्रेन कॅन्सरचा प्रकार आहे. हा वेगानं पसरतो आणि मेंदूवर हल्ला करतो. हा ब्रेन कॅन्सर जीवघेणा ठरू शकतो. न्यूरोब्लास्टोमा, काँड्रोसार्कोमा आणि मेड्युलोब्लास्टोमा हे मेंदूच्या आसपासच्या भागात होणारे ट्यूमरही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कोणतीही वेगळ्या स्वरूपाची लक्षणं किंवा शारीरिक समस्या जाणवत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं, निदान आणि उपचार सुरू करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या