सकाळचा नाश्ता
मुंबई, 28 ऑक्टोबर : सकाळी हेल्दी नाश्ता करणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. संपूर्ण दिवसाची ऊर्जा देण्याचे काम नाश्त्यातून होते, शिवाय मेंदू आणि शरीराला जणू इंधनाचा पुरवठा होतो. हेल्दी नाश्ता केल्याने चयापचय सुधारते, ज्यामुळे आपल्या कंबरेभोवती चरबी जमा होत नाही आणि तुम्ही सहज कॅलरी बर्न करू शकता. Eatdis च्या माहितीनुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही रोज सकाळी चांगला नाश्ता केला तर त्यामुळे तुमचे वजन वाढत नाही आणि कंबर आणि पोटावरील चरबीही कमी होते. संशोधनात असे आढळून आले की, जे लोक आठवड्यातून 5 ते 6 दिवस सकाळी नाश्ता करतात त्यांचे वजन इतरांच्या तुलनेत वाढत नाही. यासाठी तुम्ही नाश्त्याच्या सवयीमध्ये बदल करून तुमची कंबर स्लिम करू शकता. त्याविषयी जाणून घेऊया. उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत खा 6 ते 8 तास झोपल्यानंतर शरीराला ऊर्जेची गरज असते. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग विशेषज्ज्ञ आणि स्पोर्ट्स कायरोप्रॅक्टर डॉ. मॅट टॅनबर्ग C.S.C.S. यांच्या मते, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर काही खात नाही, तेव्हा तुमची चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) वेगात मंदावते आणि तुमचे शरीर कॅलरी जाळणे थांबवते. त्यामुळे उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत काहीतरी नाश्ता खायला हवा, त्यामुळे शरीराचे कार्य योग्य प्रकारे होईल. झोपेतून उठल्याबरोबर पाणी प्या - रोज सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरेल. खरं तर, न्याहारीपूर्वी आणि जेवणापूर्वी दोन ग्लास पाणी पिण्याने तुमचे वजन 100 पौंड कमी होण्यास मदत होते. गोड खाण्यापासून दूर रहा - जर तुम्हाला सकाळी भूक लागल्यावर गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही सवय पूर्णपणे सोडली पाहिजे. सकाळी जास्त साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहिल्यास उत्तम. उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास चांगले होईल.
भरपूर फायबर पोटात जायला हवं - फायबरयुक्त अन्न आपल्याला दीर्घकाळ भूक लागण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम. त्यामुळे तुम्हाला दिवसभर भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते. हे वाचा - नवीन महामारीचा धोका वाढवणारा व्हायरल स्पिलओव्हर म्हणजे काय? चहा कॉफी - सकाळी उठल्यापासून अर्ध्या तासाच्या आत चहा, कॉफी किंवा ग्रीन टीचे सेवन केल्यास तुमची चयापचय क्रिया चांगली राहते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिडेशन रेट वाढतो, ज्यामुळे वर्कआउटचा प्रभाव चांगला होतो आणि तुम्ही वजन सहज कमी करू शकाल. परंतु, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी उपाशी पोटी चहा-कॉफी पिणे टाळावे.