बेकिंग सोडा केवळ स्वयंपाकघरातच नव्हे तर आरोग्यासाठी आणि त्वचेच्या सुधारणांना बर्याच प्रकारे मदत करू शकतो. तो निसर्गत: क्षारयुक्त आहे ज्यामुळे त्वचा चमकदार राहते, त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते. त्वचेला टवटवीत ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त आहे. त्वचेच्या समस्यांवर उपचार म्हणून आणि सौंदर्य खुलवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा कराल जाणून घ्या. मुरुम myupchar.com च्या डॉ. अप्रतिम गोयल यांनी सांगितलं, जसजसं वय वाढतं, तशी डेड स्किनची समस्याही वाढते. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. डेड स्किन, तेलकट अशा त्वचेवर मुरुम उमटू लागतात. जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. आपल्या चेहऱ्यावरील हे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट वापरा. बेकिंग सोडा डागयुक्त त्वचेला एक्सफोलिएट करेल आणि एक नवीन थर आणण्यास मदत करेल. ही पेस्ट दिवसातून दोन किंवा तीन वेळा 3-4 मिनिटांसाठी लावू शकता. ब्लॅकहेड्स बेकिंग सोड्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्याने ब्लॅकहेड्सवर उपयुक्त आहे. ब्लॅकहेड्स सहजरित्या काढण्यास मदत होते. सनबर्न myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, बेकिंग सोडा क्षारयुक्त आहे जो सूर्यप्रकाशात काळसर झालेल्या त्वचेला खाजेपासून मुक्त करून शांत करतो. त्यातील जंतूनाशक गुणधर्म सूर्यप्रकाशामुळे होणारे अल्सर बरे करण्यास देखील मदत करतात. बेकिंग सोडा आणि थंड पाण्याची पेस्ट बनवून बाधित भागावर लावा आणि मग धुवा. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा घाला आणि त्या पाण्याने अंघोळ करा.मग टॉवेलने शरीर पुसून कोरडं करा. टॅ****निंग बेकिंग सोडा त्वचेचा काळसरपणा काढून टाकण्यास मदत करतो. एक चमचा बेकिंग सोडा, पाणी आणि व्हिनेगर अशी पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर 5-10 मिनिटं लावून ठेवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही पेस्ट वापरल्याने त्वचेचा काळसरपणा दूर होईल. पुरळ बेकिंग सोड्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यातील क्षारयुक्त गुणधर्मांमुळे ते त्वचेला कोरडे करू शकत असल्याने त्वचेवर पुरळ येण्यापासून खाज सुटणं ते सूज यापासून आराम मिळू शकतो. बेकिंग सोड्यामध्ये नारळ तेल घाला आणि 4-5 मिनिटांसाठी ही पेस्ट लावा. त्वचेचा रंग टिकवण्यासाठी स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी एक-दोन चमचे बेकिंग सोडा पुरेसं फिल्टर केलेलं पाणी किंवा गुलाब पाण्यात मिसळा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि एक मिनिटं ठेवा. थोडा मसाज करून कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून 2-3 वेळा करा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - त्वचेचे विकार आणि रोग न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._