मुंबई, 13 नोव्हेंबर : दैनंदिन जीवनात आपण नकळत अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपल्या काही सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, खराब पचन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अनेकदा आपल्या सवयी चुकीच्या आहेत कि बरोबर हे आपल्याला काळात नाही. मात्र अत्यंत साधी वाटणारी सवयही नकळत आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकते. अशीच एक सवय बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिलादेखील आहे. करीनाला नखं चावण्याची सवय आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये करीनाला नखं चावताना पाहिलं गेलं आहे. मात्र या वाईट सवयींना तुम्हीही बळी पडत असाल, तर त्याचे घातक परिणाम जाणून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही वाईट सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती देत आहोत.
‘या’ सहा सवयी व्यक्तिमत्त्वासाठी ठरू शकतात घातक5 वाईट सवयींचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो:
दाताने नखं चावणे : WebMD.com नुसार, अनेकांना नखे चावण्याची वाईट सवय असते, ज्यामुळे तुमचे दात तसेच नखे आणि त्यांच्या सभोवतालची त्वचा खराब होते. आरोग्य तज्ञांच्या मते, नखांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि जंतू असतात, ज्यामुळे तुम्ही अनेक गंभीर संक्रमणांना बळी पडू शकता.
रात्रभर जागे राहाणे : आजकाल बहुतेक लोक पार्टीमुळे किंवा कमी प्रमाणात झोप घेऊन रात्रभर जागे राहतात, परंतु डॉक्टरांच्या मतानुसार, पुरेशी झोप न मिळाल्याने तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांना बळी पडू शकता. अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी ६ ते ७ तास पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. दारू पिणे : आपल्या सर्वांना माहित आहे की, जास्त प्रमाणात मद्यपान करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज दारूचे सेवन करत असाल तर किडनी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्याने हाडे कमकुवत होतात आणि पचन व्यवस्थित नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अन्न नीट न खाणे : कामाच्या घाईमुळे बरेच लोक घाईघाईने जेवण करतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का? ही वाईट सवय लठ्ठपणा आणि पोटाशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अन्न नेहमी शांततेने आणि आरामात चावून खावे.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे 5 नैसर्गिक उपायजास्त वेळ हेडफोन वापरणे : आजकाल सोशल मीडियाच्या युगात, प्रत्येकजण हेडफोनचा दीर्घकाळ वापर करत आहे, जे केवळ आपल्या कानांसाठीच नाही तर मेंदूसाठीदेखील खूप हानिकारक आहे. बराच वेळ मोठा आवाज ऐकल्याने मेंदूच्या टिश्यूजचे नुकसान होते. यामुळे तुम्हाला बहिरेपणादेखील येऊ शकतो.