JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 12 वर्षीय मुलीला पाण्याची विचित्र अ‍ॅलर्जी; फक्त बादलीभर पाण्यानं अंघोळही घेऊ शकते जीव

12 वर्षीय मुलीला पाण्याची विचित्र अ‍ॅलर्जी; फक्त बादलीभर पाण्यानं अंघोळही घेऊ शकते जीव

या मुलीला स्वतःचा घाम आणि अश्रूही सहन होत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर : पाण्यात बुडून कित्येकांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपल्याला माहिती आहेत. मात्र फक्त बादलीभर पाण्यानं अंघोळ करूनही एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे कदाचित माहितीच नसावं. पाणी म्हणजे जीवन मात्र हेच पाणी 12 वर्षीय मुलीचा जीव घेऊ शकतं. या मुलीला पाण्याची अशी विचित्र अॅलर्जी आहे की, अंघोळ करतानाही तिचा मृत्यू ओढावू शकतो. अमेरिकेतील डेनिअलला मेक्रकेवेनला  बाटलीतील पाणी, खारं पाणी आणि नळातील पाण्याचीही अॅलर्जी आहे. तिला तिचा स्वतःचा घाम आणि अश्रूही सहन होत नाही. घाम आणि अश्रू येताच तिच्या त्वचेला खाज सुटू लागते.  आज तक च्या रिपोर्टनुसार डेनिअलला एक्वाजेनिक युर्टिसेरिया आजार आहे. ही पाण्यामुळे होणारी दुर्मिळ अशी  अॅलर्जी आहे. जगभरात 100 पेक्षाही कमी रुग्ण आहेत. डेनिअलला वयाच्या अकराव्या वर्षी तिच्या या आजाराबाबत माहिती झाली. एकदा तिच्या डोळ्यातून अश्रू आले तेव्हा आम्हाला तिच्या या अॅलर्जीबाबत समजलं, असं डेनिअलच्या आईनं सांगितलं. डेनिअल जेव्हा पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा तिच्या शरीरावर व्रण तयार होतात, ज्यामुळे तिला वेदनाही होतात. या अॅलर्जीमुळे ती पोहू शकत नाही, उन्हाळ्यात घराबाहेर पडू शकत नाही. बादलीभर पाण्यात अंघोळ करणंही तिच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हे वाचा -  चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये या अॅलर्जीमुळे डेनिअलला एनाफायलेक्टिक शॉक बसू शकतो. जेव्हा अॅलर्जी भरपूर प्रमाणात होते, तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते आणि यामुळे कित्येकांचा जीवही जाऊ शकतो. डेनिअलच्या आईनं सांगितलं की ही दुर्मिळ अशी अॅलर्जी आहे, त्यामुळे अशी काही समस्या उद्भवू शकते, याला डॉक्टरांनाही मानलं नाही. या आजारावर उपचार कसे करायचे हे त्यांनाही माहिती नाही.  एका डॉक्टरनं डेनिअलला उपाय सूचवला. सध्या ती अँटि हिस्टॅमिन घेते. अंघोळ करतानाही खूप खबरदारी घेते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या