JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / धक्कादायक! Corona vaccine घेताच डॉक्टरला लकवा; आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! Corona vaccine घेताच डॉक्टरला लकवा; आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोरोना लस (CORONA VACCINE) घेतल्यानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेक्सिको सिटी, 07 जानेवारी : जगात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणाऱ्या कोरोना लशीचे दुष्परिणाम (corona vaccine side effect) आता समोर येऊ लागले आहे. फायझरच्या कोरोना लशीचे (Pfizer Corona Vaccine) गेल्या काही दिवसांपासून साईड इफेक्ट होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहे. यूके (UK), अमेरिका (US),, फिनलँड, बुल्गारियानंतर पोतुर्गाल आणि मेक्सिको सिटीमध्येही (Mexico) गंभीर प्रकरण दिसून आलं आहे. मेक्सिकोमध्ये महिला डॉक्टरला फाइझरची कोरोना लस दिल्यानंतर लकवा मारला तर पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोमध्ये डॉ. कार्ला यांना कोरोना लस दिल्यानंतर त्यानंतर त्यांना आधी त्वचेचं इन्फेक्शन झालं आणि नंतर लकवा मारला. अर्ध्या तासात त्यांच्या शरीरावर चकत्या पडल्या, त्यांना अशक्तपणा आला. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयानं याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, या महिलेचा मेंदू आणि स्पाइनल कॉर्डमध्ये सूज आली आहे. ज्याच्यावर उपचार करण्यात आले. तिला अँटिबायोटिक्सची अॅलर्जी होती. त्यामुळेच असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले. लशीमुळेच लकवा मारला असं आम्ही सांगू शकत नाही. हे दुष्परिणाम लशीचे आहेत की आणखी कोणत्या कारणामुले याचा तपास करणं गरेजचं आहे. हे वाचा -  भारताला मोठं यश; पहिली स्वदेशी लस COVAXIN चं शेवटचं ट्रायलही यशस्वी दुसरीकडे पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा लस घेताच 48 तासांतच  मृत्यू झाला आहे.  41 वर्षीय सोनिया असेवेडो ( Sonia Acevedo)  यांनी लस घेतली त्यानंतर तिच्यामध्.े कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेनाही. मात्र अचानक मृत्यू झाला.  ती पोर्तो शहरातील पोर्तुगीज इन्स्टिट्युट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये काम करत होती. तिचे वडील अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगाल डेली वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार ती एकदम ठीक होती, स्वस्थ होती. तिला कोणताही आजार नव्हता. लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाही. हे वाचा -  जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लशीत अग्रणी याआधी फिनलँडमध्ये पाच लोकांमध्ये लशीचे गंभीर दुष्परिणाम दिसले होते. ब्रिटनमध्येही दोन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरावर लाल निशाण दिसू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) संपूर्ण जगात या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिलेली आहे. आता लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर फाइझरनं अॅलर्जी असलेल्या लोकांना कोरोना लशीच्या वापराबबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या