JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन? अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण

दीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन? अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण

दीपिका पादुकोणनंतर (deepika padukon) दिया मिर्झाचंही (dia mirza) ड्रग्ज कनेक्शन असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समधून केला जातो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर (rhea chakraborty) अनेक अभिनेत्रींचं ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात बड्या अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone). शिवाय या प्रकरणात आता दिया मिर्झाचं (dia mirza) नाव जोडलं जातं आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये दिया मिर्झाचंही नाव असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समधून केला जातो आहे. एनसीबी दियालादेखील समन्स बजावणार असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत एनसीबीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणात आपलं नाव समोर येताच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत दियाने आपली बाजू मांडली आहे. आपल्यावरील सर्व आरोप तिनं फेटाळून लावले आहेत.

संबंधित बातम्या

दियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये दिया म्हणाली, माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळते. हे आरोप खोटे, निराधार आणि वाईट प्रवृत्तीतून करण्यात आले आहे. अशा पत्रकारितेचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होईल. मी खूप मेहनतीने आणि वर्षांनी माझं बनवलेलं करिअर यामुळे उद्धवस्त होईल. मी माझ्या आयुष्याक कधीच ड्रग्ज खरेदी केले नाही आणि घेतलेही नाहीत. हे वाचा -  “एक चुटकी ड्रग की नशा…”, DRUG संबंधी चॅट समोर येताच ट्रोल झाली दीपिका दियाने ही पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटीजदेखील तिच्यासाठी उभे राहिले आहेत. त्या सर्वांचे दियाने आभार मानले आहेत. “माझ्यासाठी उभे राहणाऱ्या माझ्या समर्थकांची मी आभारी आहे. या प्रकरणात एक भारतीय नागरिक म्हणून मी कायदेशीर मदत घेणार”, असं दिया म्हणाली. हे वाचा -  ड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर? 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत.  दीपिकाचे ड्रग्जसंबंधी चॅटही समोर आले आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतचे हे चॅट आहेत. त्यामुळे करिश्मा प्रकाश आणि KWAN  टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. त्यानंतर आता दीपिकालाही समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.NCB सुरुवातीला करिश्मा प्रकाशची चौकशी करेल आणि गरज पडल्यास दीपिका पादुकोणलाही समन्स बजावला जाईल, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या