JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Tips: सुखाचा होईल संसार; वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने फक्त या गोष्टींची वेळीच काळजी घ्या

Vastu Tips: सुखाचा होईल संसार; वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने फक्त या गोष्टींची वेळीच काळजी घ्या

काहीवेळा वैवाहिक जीवनात (married life) जीवनसाथीसोबत काही गोष्टी पटत नाही आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद आणि तणाव निर्माण होतो. कधी कधी घरातील वास्तुदोषांमुळेही (Vastudosha) असं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै : पती-पत्नीचे नाते हे आयुष्यातील सर्वात सुंदर नाते मानले जाते. जेव्हा दोन भिन्न लोक लग्न करतात तेव्हा ते त्यांचे विचार एकमेकांशी शेअर करतात. पण काहीवेळा वैवाहिक जीवनात (married life) जीवनसाथीसोबत काही गोष्टी पटत नाही आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद आणि तणाव निर्माण होतो. कधी कधी घरातील वास्तुदोषांमुळेही (Vastudosha) असं होतं. अशा समस्या कमी होण्यासाठी वास्तुशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. त्यांचा अवलंब केल्याने तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातही आनंद आणू शकता आणि तुमच्या जीवनसाथीसोबत हसत-खेळत वेळ घालवू (Happy Life Vastu tips) शकता. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, बेडरूमचे दिवे जास्त तेजस्वी नसावेत आणि बेडरूममध्ये प्रकाश असा नसावा की त्याचा उजेड थेट बेडवर पडेल, वास्तूनुसार बेडवर नेहमी मागून किंवा डावीकडून प्रकाश यावा. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार पलंग घरात कोणत्याही तुळईखाली नसावा. तुळईखाली पलंग ठेवल्याने नातेसंबंधातील अंतर वाढते आणि तुळईखालून पलंग काढणे शक्य नसेल तर त्याखाली बासरी किंवा विंड चाइम लावावा, यामुळे वास्तुदोष दूर होतो, असे मानले जाते. वास्तूनुसार बाथरूम बेडरूममध्ये नसावे आणि जर तुमचे बाथरूम बेडरूममध्ये असेल तर त्याचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. याशिवाय रद्दी किंवा कचरा यासारख्या वस्तू आपल्या पलंगाखाली चुकूनही ठेवू नयेत. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. हे वाचा -  नशीबवान लोकांच्या हातावर असते अशी राहु रेषा! प्रचंड धन-दौलत-नाव कमावतात ही माणसं वास्तुशास्त्रानुसार बेडरूमच्या भिंती कधीही पांढर्‍या, लाल किंवा भडक रंगाच्या नसाव्यात. बेडरूमच्या भिंती नेहमी गडद रंगापेक्षा हलक्या रंगाच्या असाव्यात. हिरवा गुलाबी किंवा आकाशी रंग उत्तम प्रभाव देतो आणि त्यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. हे वाचा -  पोटाच्या अनेक विकारांवर जालीम आहे आल्याचा मुरंब्बा! जाणून घ्या सर्व फायदे वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही मांसाहारी प्राण्याचे, सिंहाची गर्जना करणारे चित्र बेडरूममध्ये कधीही ठेवू नये. याशिवाय मावळत्या सूर्याची किंवा असहाय व्यक्तींची छायाचित्रे बेडरूममध्ये ठेवू नयेत. बेडरूममध्ये ही चित्रे ठेवल्याने वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या