JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / Galwan Valley: गलवान चकमकीत नदीत वाहून गेले 38 चिनी सैनिक, ऑस्ट्रेलियन मीडियाकडून चीनची पोलखोल!

Galwan Valley: गलवान चकमकीत नदीत वाहून गेले 38 चिनी सैनिक, ऑस्ट्रेलियन मीडियाकडून चीनची पोलखोल!

गलवान खोऱ्यातील चकमकीत चीनचं भारतापेक्षा जास्त नुकसान झाल्याचं भारतानं वारंवार सांगितलं आहे. त्याचे अनेक पुरावे मिळत आहेत. पण चीनचा खोटेपणाही लपून राहिलेला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लडाख, 03 फेब्रुवारी: जून 2020 मध्ये पूर्व लडाखमधील (East Ladakh) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारतीय सैन्याची चीनशी झालेली हिंसक (Indo-China Clash) चकमक सगळ्यांनाच आठवत असेल. या चकमकीनंतर चीननं भारताविरोधात बराच कांगावा केला होता. पण अनेक आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्समधून चीनचा खोटेपणा समोर आलाच. या चकमकीत कर्नल संतोष बाबूसह (Col Santtosh Babu) 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. मात्र चीनवर त्यांच्या मृत सैनिकांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातो. याच मुद्द्यावर आता एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील ‘द क्लॅक्सन’ (The Klaxon) या वृत्तपत्रात या संदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. खरं तर भारत-चीनमधील चकमकीत चीनचे 38 सैनिक नदीत वाहून गेले होते. मात्र चीननं फक्त 4 सैनिकांचाच मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली होती. यावरच ‘गलवान डिकोडेड’ या नावाने एक रिपोर्ट छापण्यात आला आहे. इंडिपेंडंट सोशल मीडिया रिसर्च टीमनं हा रिपोर्ट तयार केला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे ((PLA) ) अनेक जवान या चकमकीदरम्यान गलवान नदीत वाहून गेले होते, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. हे वाचा- Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? चीनचा खोटेपणा ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिलेल्या या वृत्तानं जगासमोर पुन्हा एकदा उघड झाला आहे. अनेक अनामिक अभ्यासक आणि चिनी ब्लॉगर्सच्या निष्कर्षांवरून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या आधारे या अहवालात माहिती देण्यात आली आहे. हा रिपोर्ट 15 जून 2020 च्या रात्री नेमकं काय घडलं यावर पूर्ण प्रकाश टाकतो. 15 जून 2020 रोजी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यावेळेस तिथे प्रत्यक्ष घडलेल्या घटना चीनने लपवल्या होत्या. संपूर्ण जगाला चीननं त्यांच्या सोयीस्कर आणि कित्येक खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. चिनी अधिकाऱ्यांनी अनेक ब्लॉग्ज किंवा माहिती असलेली पेजेसही इंटरनेटवरून हटवली. मात्र चीनमधून मिळालेले हे डिजिटल पुरावे सत्य घटना सांगतात. जून 2020 मध्ये गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच दोन्ही देश अशा प्रकारे समोरासमोर आले होते. तिथे मृत्यू झालेल्या सैनिकांची खरी संख्या चीननं कधीही सांगितली नाही. पण गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात चीननं त्यांच्या चार सैनिकांना मरणोत्तर सन्मानित करण्याचं जाहीर केलं. यातील ज्युनिअर सार्जंट वांग झुओरानचा मृत्यू नदीत बुडाल्यामुळे झाला तर अन्य तिघांचा प्रत्यक्ष संघर्षादरम्यान असा चीनचा दावा होता. पण 15 जून रोजी गलवान नदीच्या एका टोकाला भारतीय सैनिकांनी तात्पुरत्या स्वरुपाचा एक पूल बांधला होता. तिथून या संघर्षाला सुरुवात झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. चीननं या परिसरात अनेक बेकायदेशीर, अवैध कायमस्वरुपी बांधकामं करायला सुरुवात केली. त्यानंतर भारतानं पूल बांधायचं ठरवलं होतं. त्यामुळे या परिसरात तणाव वाढला होता. हे वाचा- चिनी ड्रॅगनच्या कुरापतीमागे 5 बोटांची रणनीती काय आहे? काय आहेत भविष्यातील धोके? एप्रिल 2020 नंतर चीनकडून भारताबरोबर झालेल्या कराराचं वारंवार उल्लंघन केलं जात होतं. बफर झोनमध्ये पॅट्रोलिंग आणि अवैध बांधकाम करण्याची सुरुवातही चीननं केली होती. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नल संतोष बाबूंच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं गलवान नदीवर पूल बांधायला सुरुवात केली. अर्थातच चिनी सैनिकांनी याचा विरोध केला. 6 जून रोजी 80 सैनिक हा पूल तोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे आले. तर 100 भारतीय सैनिक त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे आले असं या ऑस्ट्रेलियातील वृत्तात म्हटलं आहे. 6 जून रोजी भारतीय आणि चिनी सौनिकांमध्ये दोन्ही सैन्य बफर झोनमधून माघारी जातील असा करार झाला. पण चीननं या काराराचंही उल्लंघन केलं. 15 जून रोजी संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय सैनिक चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे आलं तेव्हा चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आपण कमी पडतोय, आपला पराभव होतोय हे लक्षात येताच चिनी सैनिक माघार घ्यायला लागले. रात्रीच्या अंधारातच गलवान नदीत उतरून त्यांनी नदी पार करण्याचा निर्णय घेतला. पण नदीचा प्रवाह वाढला आणि चिनी सैनिक त्यात वाहून गेले, अशी घटना या वृत्तामध्ये सांगितली आहे. या चकमकीत आपलं काहीही नुकसान न झाल्याचा चीनचा दावा किती खोटा आहे हे या रिपोर्टवरून स्पष्ट होतं. चीननं त्यांच्या मृत्यू झालेल्या सैनिकांची आकडेवारी तर खोटी सांगितलीच होती पण या संघर्षाबद्दल आता चर्चा होऊ नये यासाठी जबरदस्तीही केली होती. चकमकीत चीनचं भारतापेक्षा जास्त नुकसान झाल्याचं भारतानं वारंवार सांगितलं आहे. त्याचे अनेक पुरावे मिळत आहेत. पण चीनचा खोटेपणाही लपून राहिलेला नाही. या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले ही गोष्ट भारतानं कधीही लपवली नाही पण चीनचे मात्र 38 किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त सैनिक वाहून गेले,मारले गेले हे चीननी लपवलं. प्रत्यक्षात चीनचे 38 सैनिक नदीत वाहून गेल्याचं सत्य जगभरातील अनेक माध्यमांनी समोर आणलं आहे, हे महत्त्वाचं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या