JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Kuhlad Chai Benefits : फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असतो कुल्हड चहा; पाहा काय आहेत फायदे

Kuhlad Chai Benefits : फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असतो कुल्हड चहा; पाहा काय आहेत फायदे

मातीचे कप हे एक इको फ्रेंडली उत्पादन आहे, जे चहा प्यायल्यानंतर पोटात ऍसिडिटीची समस्या दूर ठेवण्यास मदत करते. यासोबतच या कपमध्ये चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 नोव्हेंबर : हिवाळ्यात मातीच्या कपमध्ये चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते. केवळ खेड्यापाड्यातच नाही तर आता शहरांमध्येही मातीच्या कपमधील चहा लोकप्रिय होत आहे. अनेक रेल्वे स्थानके आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये आढळणारे हे मातीचे कप आता मोठमोठे मॉल आणि दुकानांची शान बनू लागले आहेत. मातीच्या कपमध्ये चहा दिल्यास त्याला एक वेगळा तिखट सुगंध येतो, ज्यामुळे चहाची चव आणखी वाढते. पण ते आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. मात्र मातीच्या कपमध्ये चहा प्यायल्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. उलट ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. स्लर्पच्या मते, हे एक पर्यावरणपूरक म्हणजेच इकोफ्रेंडली उत्पादन आहे. जे चहा प्यायल्यानंतर पोटात ऍसिडिटीची समस्या दूर ठेवण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया मातीच्या कपमध्ये चहा पिण्याचे इतर कोणते फायदे आहेत.

गर्भाशय निरोगी राहण्यासाठी हे पदार्थ नियमित आहारात घ्या, प्रसूती होते सुलभ

मातीच्या कपमध्ये चहा पिण्याचे फायदे इन्फेक्शन रोखण्यास होते मदत जेव्हा तुम्ही चहा बाहेर एखाद्या ठिकाणी चहा पिण्यासाठी जाता, तेव्हा तिथे तुम्हाला प्लास्टिक किंवा काचेच्या ग्लासमध्ये चहा दिला जातो. मात्र हे कप व्यवस्थित धुतलेले असतातच असे नाही. त्याउलट मातीचा कप एकदाच वापरला जातो. म्हणूनच या कपमधून कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी होते.

गॅसेस होत नाही मातीच्या कपमध्ये अल्कलाइन आढळते, जे पोटात अॅसिड तयार होऊ देत नाही, त्यामुळे चहा प्यायल्यानंतर गॅसची समस्या होत नाही. अशाप्रकारे चहा प्यायल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येणे, पचनाशी संबंधित समस्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

चांगलं पचन होण्यासाठी या कुशीवर झोपा; पोटाचं पण आरोग्य राहतं, जळजळही थांबेल

संबंधित बातम्या

शरीरात केमिकल जात नाही अनेकवेळा आपण फोम कप किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये गरम चहा पितो, त्यामुळे चहामध्ये रसायनाचा प्रभाव पडतो. पण मातीपासून बनवलेल्या या कपमध्ये चहा प्यायल्यावर तो इकोफ्रेंडली आणि केमिकल फ्री असल्यामुळे आपले शरीर केमिकलपासून दूर राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या