स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तिशीनंतर खा हे पदार्थ 

वयानुसार व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते आणि मेंदूच्या पेशी कमकुवत होतात. 

मात्र तिशीनंतरही काही पदार्थ खाल्याने तुमची स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. 

सुका मेवा खाल्ल्याने हृदय निरोगी राहाते आणि यामुळे मेंदूचे आरोग्यही सुधारते. 

फॅटी फिश ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे समृद्ध स्रोत आहेत, जे मेंदूसाठी फायदेशीर असते. 

कॅफीन तुमच्या मेंदूला सतर्क ठेवते. त्याचबरोबर तुमचा मूडही सुधारते. 

अँटिऑक्सिडंटने भरपूर ब्लूबेरी तुमच्या मेंदूसाठी फायदेशीर असतात. 

हळदीतील कर्क्युमिन थेट मेंदूमध्ये प्रवेश करून तेथील पेशींना फायदा देते. 

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के असते, जे आपल्या मेंदूसाठी चांगले मानले जाते. 

भोपळ्याच्या बिया शरीर आणि मेंदूचे फ्री-रॅडिकल नुकसान होण्यापासून रक्षण करतात. 

डार्क चॉकलेटमध्ये मेंदूला चालना देणारी संयुगे असतात, हे स्मरणशक्ती वाढवू शकतात.