हृदय निरोगी ठेवण्याच्या टिप्स
नवी दिल्ली, 08 डिसेंबर : आताच्या काळात खाण्यापिण्याचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की, त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो याकडे आपलं लक्षच जात नाही. खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे आपण आपल्या शरीराचं कायमचं नुकसान करून घेत असतो. पण, योग्य वेळी त्या चुका सुधारायला हव्यात. आपल्या खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो. आजच्या काळात हृदयसंबंधी आजार (Cardiovascular Disease) वाढलेले आहेत. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक असे त्रास तरुण वयातही होतात. त्यामुळे हृदयाची योग्य काळजी घ्यायला हवी. त्यातच कोरोनासारख्या विषाणूंचा हल्ला हृदयावर झाल्यास पूर्वीपासून हृदयासंबधी आजार असलेल्यांना धोका जास्त वाढतो. त्यामुळे हृदयाची काळजी घ्यायला हवी. हृदयाची काळजी घेण्यासाठी या गोष्टी उपयोगी आहेत. दालचिनी मसल्यांच्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी दालचिनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील वापरता येऊ शकते. दालचिनीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्यात आयर्न,व्हिटॅमिन बी 6,मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं. याशिवायय, दालचिनीत अँटीऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. तसंच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. यामुळे हाडे मजबूत होतात, हृदय निरोगी राहत. यासाठी दालचिनीचा काढा बनवून प्यावा. आळशी/जवस आयुर्वेदात आळशीला खूप महत्त्व आहे आळशी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यात फायबर,सेलेनियम,पोटॅशियम,झिंक,व्हिटॅमिन बी 1,बी 6, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, कॉपर आणि आयर्नसारखे पोषक घटक असतात. त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. आळशी अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. आळशी भाजून खाण्यानेही फायदा होतो.
तुळस हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुळशीचं सेवन फायदेशीर असते. तुळशीत अनेक पोषक घटक असतात. तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी,लोह,झिंक,कॅल्शियम आणि क्लोरोफिल सारखे पोषक घटक असतात. या व्यतिरिक्त तुळशीत टार्टरिक,सायट्रीक ऍसीड असतं. त्यामुळे डायजेशन सुधारतं आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते आणि ब्लड शुगर आणि ब्लड प्रशर देखील नियंत्रणात राहतं. हे वाचा - लग्न टिकवायचं असेल तर काय कराल? घटस्फोट घेतलेल्या पुरुषांनीच दिल्या बेस्ट टीप्स! लसूण स्वयंपाकासाठी वापराला जाणारा लसूण बहुगुणी असतो. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. त्यात ऍलिसिन असतं. त्यामुळे हृदय निरोगी राहतं. याशिवाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो. हे वाचा - नाभीवर तेल लावणे फायद्याचेच, पण तुम्हाला नाभीवर हिंग लावण्याचे फायदे माहितीये? दुधी दुधीमध्ये पोटॅशियम जास्त असतं. वजन कमी करण्यासाठी आपण त्याचं सेवन करू शकता, दुधी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेऊन हृदय निरोगी ठेवते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)