मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लग्न टिकवायचं असेल तर काय करायचं? घटस्फोट घेतलेल्या पुरुषांनीच दिल्या बेस्ट टीप्स!

लग्न टिकवायचं असेल तर काय करायचं? घटस्फोट घेतलेल्या पुरुषांनीच दिल्या बेस्ट टीप्स!

दोन भांडी एकत्र ठेवली, की त्यांचा आवाज होणारच, असा वाक्प्रचार ऐकला असेल. हाच नियम पती-पत्नीलाही लागू होतो. दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, तर त्यांचे लहान-मोठे वाद होतातच.

दोन भांडी एकत्र ठेवली, की त्यांचा आवाज होणारच, असा वाक्प्रचार ऐकला असेल. हाच नियम पती-पत्नीलाही लागू होतो. दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, तर त्यांचे लहान-मोठे वाद होतातच.

दोन भांडी एकत्र ठेवली, की त्यांचा आवाज होणारच, असा वाक्प्रचार ऐकला असेल. हाच नियम पती-पत्नीलाही लागू होतो. दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, तर त्यांचे लहान-मोठे वाद होतातच.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 डिसेंबर : दोन भांडी एकत्र ठेवली, की त्यांचा आवाज होणारच, असा वाक्प्रचार ऐकला असेल. हाच नियम पती-पत्नीलाही लागू होतो. दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, तर त्यांचे लहान-मोठे वाद होतातच. कोणत्याही अर्थपूर्ण नातेसंबंधात संघर्ष अपरिहार्य आहे. कारण लग्न ही अजिबात सोपी गोष्ट नाही. ते यशस्वी होण्यासाठी जोडप्यांना फार कष्ट घ्यावे लागतात. लग्नामध्ये अनेक प्रकारच्या तडजोडी, समजूतदारपणा, संवाद, एकमेकांबद्दल ओढ आणि प्रेम असणं गरजेचं असतं. यापैकी एक घटक कमी पडला, तरी पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण होते. कधी-कधी प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचतं. काही घटस्फोटित पुरुषांनी आपल्या अनुभवातून इतरांचं लग्न वाचवण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी काही आश्चर्यकारक टिप्स दिल्या आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

विवाहित पुरुषांनी आपल्या पत्नीच्या बाबतीत कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत काही टिप्स या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. या टिप्स काही प्रमाणात पत्नींनाही लागू होतात.

1) तिच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नका : अनेकांना लग्नानंतर जोडीदारामध्ये बदल घडवून आणण्याची सवय असते. एक पती म्हणून ही सर्वांत मोठी चूक आहे. कारण, तुम्ही ज्या मुलीशी लग्न केलं आहे, ती तुम्हाला प्रथमदर्शनी आहे तशीच आवडलेली होती. तिच्यामध्ये तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर लवकरच तुम्हाला ती आवडेनाशी होईल. याशिवाय, तुम्ही तिला बदलण्याचा प्रयत्न करत असाल आणि हे पत्नीच्या लक्षात आलं तर ती नाराज होईल.

2) फक्त तिचा मानसिक आधार बना : जेव्हा पत्नी दु:खी किंवा अस्वस्थ असते तेव्हा तिला आनंदी केलंच पाहिजे, हे गरजेचं नाही. अशा वेळी फक्त तिला मिठी मारा आणि सर्व काही ठीक होईल असा धीर द्या. तिला तुमच्याजवळ मन मोकळं करता येईल, यासाठी तिच्या सोबत राहा. तुम्ही तिचे सल्लागार न होता आधार व्हा. काही वेळा समोरच्या व्यक्तीचं फक्त बोलणं ऐकणं आवश्यक आहे. त्यावर नेहमी प्रतिसाद दिलाच पाहिजे, हा गैरसमज आहे. अशानं काही वेळा गोष्टी बिघडू शकतात. ती नाराज असताना पळून जाऊ नका. काही पुरुषांना भावनिक प्रकरण हाताळणं जमत नाही. तुम्ही त्यांच्यापैकी एक असलात, तर तुम्ही निदान तिच्या सोबत थांबलं पाहिजे. चहा-कॉफी किंवा तिला जे आवडतं ते तिला देण्याचा प्रयत्न करा.

3) तिचे लाड करणं थांबवू नका : पत्नीला गृहीत धरू नका. तिने तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. तुम्हीदेखील तिला आनंदी ठेवण्याचं, तिचं रक्षण करण्याचं वचन दिलेलं असतं. ही बाब लक्षात ठेवून तिचे लाड करा. आळशीपणा न करता तिला अधूनमधून डेटसाठी बाहेर घेऊन जा. तिला सरप्राइज द्या. या गोष्टींमध्ये तुम्ही आळशीपणा केला तर नातं बिघडण्याची शक्यता असते.

4) स्वत:च्या आनंदाची जबाबदारी स्वत: घ्या : अनेक पुरुषांना वाटतं, की त्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीची आहे; मात्र हे चुकीचं आहे. तुम्ही तिला सांगाल तेव्हा सांगाल तसं वागण्यास तुमची पत्नी म्हणजे कळसूत्री बाहुली नाही. तुमचा आनंद तुमच्याच हातात आहे. त्यामुळे तुमचा आनंद स्वतः शोधला पाहिजे.

5) खर्चाची चिंता करू नका : वैवाहिक आयुष्यात पैसे आणि त्याची बचत महत्त्वाची आहे; पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत पत्नीला खर्च करण्यापासून थांबवाल. ही गोष्ट तुमच्या रिलेशनशfपसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पत्नीची इच्छा असेल तिथे नक्कीच खर्च केला पाहिजे.

First published: