JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / या मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो, रोजचा आहार-विहार बनवा अधिक हेल्दी 526683

या मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो, रोजचा आहार-विहार बनवा अधिक हेल्दी 526683

आयुर्वेदात प्राचीन काळी सांगितलेल्या गोष्टी आजही प्रभावी आहेत. या सोप्या आयुर्वेदिक टिप्स नक्की लक्षात ठेवा.

जाहिरात

प्रमाणापेक्षा जास्त भाज्या खाणं किंवा कच्च्या भाज्या खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. काही भाज्यांचं अतिसेवन आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 2 मार्च : हेल्दी राहण्यासाठी लोक काय करत नाहीत? योगा, व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि डायटिंगसुद्धा. मात्र तुम्हाला माहीत आहे का आयुर्वेदात काय सांगितलं आहे? (health tips in Marathi) आहार-विहाराबाबत आयुर्वेदात अनेक मोलाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर खूप चांगले बदल शरीरात दिसतील. सोबतच तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल. वजनही नियंत्रणात राहील. तुमची पचनक्रियाही सुदृढ राहील. हे आहेत ते नियम (ayurvedic health tips) उकडून किंवा अर्धवट उकडून खा भाज्या भाज्यांना जास्त शिजवू नका. असं केल्यानं त्यांची पोषकतत्व कमी होतात. यातून आरोग्यालाही नुकसान होतं. जेवण बनवताना याकडे लक्ष द्या, की त्या कच्च्या राहणार नाहीत, सोबत जास्त शिजणारही नाहीत. (tips from Ayurveda for healthy life) कच्चे मसाले भाजून, कुटून वापरा रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यास खडे मसाले तव्यावर भाजून आणि कुटून वापरा. विशेषतः बदलत्या ऋतूमध्ये अद्रकही तव्यावर भाजून खाऊ शकता. (Ayurvedic lifestyle to live healthy life) पीठ चाळू नका गव्हात फायबर असतं. मात्र अधिकतर फायबर या गव्हाच्या कोंड्यामध्ये असतं. त्यामुळं लक्षात ठेवा, गहू न दळता वापरा. कोंड्यासह असलेलं पीठ आरोग्यासाठी चांगलं असतं. (health and Ayurveda) हेही वाचा मराठमोळ्या अभिनेत्री अर्चना जोगळेकर आज परदेशात राहून करतात हे काम…. थंड अन्न खाल्ल्यानं पचनशक्ती कमजोर होते थंड खाणं खाणं टाळा! हे तुमची पचनशक्ती खराब करू शकतं. सोबतच या गोष्टीकडंही लक्ष द्या, की कधीच खूप पोट भरेपर्यंत जेऊ नका. आयुर्वेद सांगतो, की असं केल्यानं जेवण सहज पचतं. हेही वाचा …म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय; मास्कचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा वैतागले! गोड कमी खा आयुर्वेदानुसार, गोड कमी खाल्लं पाहिजे. गोडाचा पर्याय म्हणून मध किंवा गूळ वापरू शकता. हा तुम्हाला मधुमेहासारख्या आजारांपासून वाचवू शकतो. (Disclaimer - या लेखात दिलेली सगळी माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारलेल्या आहेत. news 18 Marathi याला दुजोरा देत नाही. याची अमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या