JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / भिजवलेले बदाम आणि बेदाणे एकत्र खाल्ल्याने आरोग्याला 'हे' होतात जबरदस्त फायदे

भिजवलेले बदाम आणि बेदाणे एकत्र खाल्ल्याने आरोग्याला 'हे' होतात जबरदस्त फायदे

आयुर्वेदात आरोग्याला गुणकारी पदार्थांचं सेवन करायला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही तंदुरूस्त राहता आणि आजार होण्याची शक्यता कमी असते. भिजवलेले बदा आणि बेदाणे नाश्त्याला एकत्रितपणे खाल्ले तर काय फायदे होतात याबद्दल आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : चांगलं आरोग्य म्हणजे दमदार रोगप्रतिकार शक्ती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण तितकंच पुरेसं नाही आपलं आरोग्य सर्वसमावेशक पद्धतीने बळकट असायला हवं. रोजचा आहार आणि त्यासोबत काही सुकामेवा आपण खाल्ला तर आरोग्य चांगलं रहायला मदत होते. कोरोनाच्या काळानंतर प्रत्येकच जण आपल्या आरोग्याबाबत प्रचंड जागरुक झाला आहे. भिजवलेले बदाम (Soaked almonds) खाल्ल्यामुळे आपल्याला शक्ती मिळते हे आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. तसंच बेदाणे खाण्याचाही आरोग्याला उपयोग होतो हे तुम्हाला माहीत असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, भिजवलेले बदाम आणि भिजवलेले बेदाणे (Soaked raisins) एकत्र खाल्ल्याने आरोग्याला किती फायद्याचं आहे? सकाळच्या नाश्त्यात भिजवलेले बदाम आणि भिजवलेले बेदाणे खाल्ल्याने अनेक फायदे होतात. आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार (Dr. Deeksha Bahwsar) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे ती आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत. डॉ. दीक्षा भावसार यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी नाश्ता करणं आरोग्यासाठी खूपच चांगलं असते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर उर्जा (Energy) मिळत राहते. त्यामुळे प्रोटिन, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबं आणि फायबर अशी अनेक पोषकतत्त्व शरीराला मिळवून देणासाठी नाश्त्यामध्ये भिजवलेले बदाम आणि बेदाणे यांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. या नाश्त्याचा आहारात समावेश केला तर कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. वाचा :  हिवाळ्यात मेथीच्या पराछ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, पुरुषांना होईल जबरदस्त फायदा मासिक पाळीत पायात येणाऱ्या गोळ्यांपासून सुटका भिजवलेले बदाम आणि बेदाणे एकत्र खाल्ल्याने महिलांना मासिक पाळीत (Menstrual Cycle) होणाऱ्या त्रासापासून सुटका होते. बऱ्याच महिलांना मासिक पाळीच्या काळात पायात गोळे येतात त्यातून सुटका होऊ शकते. या नाश्त्यामुळे पोट भरलेलं राहतं. उर्जा मिळते भिजवलेले बदाम आणि बेदाणे नाश्त्यात एकत्र खाल्ल्याने शरीराला पुरेशी उर्जा दिवसभर मिळत राहते. ज्यामुळे कुठलंही काम केलं तरीही थकायला होत नाही. पचनक्रिया सुधारते भिजवलेले बदाम आणि बेदाणे नाश्त्यात एकत्र खाल्ल्याने तुमची पचनक्रिया (Digestion) सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. वाचा :  मेथी-ओव्याचं पाणी अनेक समस्या करेल दूर, जाणून घ्या फायदे स्मरणशक्ती चांगली राहते भिजवलेले बदाम आणि बेदाणे नाश्त्यात एकत्र खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य (Health Of Brain) चांगलं राहतं. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती (Memory) चांगली राहते. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याचं तुमचं कौशल्य अबाधित राहतं. त्वचा आणि केसांसाठीही आहे गुणकारी भिजवलेले बदाम आणि बेदाणे नाश्त्यात एकत्र खाल्ल्याने त्वचा आणि केसांनाही भरपूर फायदा होतो. या दोन्ही सुक्यामेव्यांत अँटिऑक्सिडंट (Antioxidants) असतात त्यामुळे तुमची त्वचा आणि केसांसाठी ते फायद्याचे ठरतात. कोलेस्ट्रॉल व ब्लड प्रेशर कंट्रोल करतो भिजवलेले बदाम आणि बेदाणे नाश्त्यात एकत्र खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करायलाही मदत होते. अशाप्रकारे भिजवलेले बदाम आणि बेदाणे एकत्र खाण्याने शरीराला खूप फायदे होतात. त्यामुळेच आपलं आरोग्य तंदुरुस्त राहतं. त्यामुळे तुम्हीही असा नाश्ता सुरू करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या