JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला

Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला

दिवाळीला आपण आपल्या घरी खातोच पण इतरांच्या घरीही गोड पदार्थांचा आस्वाद घेतो. तुम्ही या पद्धतीने मिठाई खाल्ल्यास तुमची तब्येतही व्यवस्थित राहील आणि तुम्ही सणाचा पुरेपूर आनंदही घेऊ शकाल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑक्टोबर : भारतीय सण म्हणजे खवय्यांसाठी मेजवानी असते. प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवताना मिठाईची साथ प्रत्येकाला हवी असते. दिवाळी म्हणजे तर हक्काने फराळाचे आणि गोड पदार्थ खाण्याचे दिवस. गुलाब जामुन, बर्फी, लाडू आणि अनेक प्रकारचे गोड पदार्थ दिवाळीच्या वेळी आपल्या घरी बनतात. दिवाळीला आपल्याकडे पद्धत आहे. इतरांना ‘फराळाला या’ म्हणण्याची. आपण आपल्या घरी खातोच पण इतरांच्या घरीही गोड पदार्थांचा आस्वाद घेतो. मात्र याचदरम्यान काही लोकांना वजन वाढण्याची, तब्येत खरं होण्याची चिंता असते. पण फराळ खाण्याचा मोहदेखील सुटत नाही. अशावेळी फराळाचे पदार्थ कमी प्रमाणात खावे का? कोणते पदार्थ खावे, कसे खावे? असेही प्रश्न आपल्याला पडतात. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मिठाई खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. या पद्धतीने मिठाई खा. तब्येतही व्यवस्थित राहील आणि तुम्ही सणाचा पुरेपूर आनंदही घेऊ शकाल.

दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना? असे ओळखा बनावट पदार्थ

अशा पद्धतीने खा गोड पदार्थ - दिवाळी हा आनंदाचा सण असतो. त्यामुळे दिवाळीत कोणताही गोड पदार्थ खाताना तो हक्काने आणि आनंदाने खावा. कोणत्याही दडपणामध्ये आणि अपराधीपणाच्या भावनेने खाऊ नये. खरं तर केवळ दिवाळीतील पदार्थच नाही इतरवेळीही कोणतेही अन्न खाताना ते अशाप्रकारे तणावामध्ये खाऊ नये.

- दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीत गोड पदार्थ नक्की खा. पण घरी बनवलेले, पौष्टिक आणि सुरक्षित पदार्थ खा. बाहेरून गिफ्ट आलेल्या हॅम्परमधले गोड पदार्थ बऱ्याचदा आपल्या आरोग्याला हानी पोचवू शकतात. कारण ते बनवताना त्यामध्ये कोणते तेल किंवा तूप वापरलेले आहे हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे गोड पदार्थ खा. पण घरी बनवलेले, गिफ्ट हॅम्परमधले नाही.. - दिवाळी आनंद वाटण्याचा सण असतो. जसा आनंद तशीच तुम्ही मिठाईसुद्धा सर्वांसोबत शेअर करून, मिळून मिसळून खा. एकटे किंवा लोकांचा डोळा चुकवून मिठाई खाऊ नका. असे केल्यास तुम्ही जास्त मिठाई खाल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. - मिठाई मिळून मिसळून जरी खात असाल तरी एका वेळी एकच खा. एकावेळी पूर्ण बॉक्स संपवायचा म्हणून कितीही खाऊ नका. अनेक प्रकारच्या मिठाया जरी ट्रे करायच्या स्टील तरी सर्व एकदम खाऊ नका. - मिठाई खाताना, किंवा कोणताही पदार्थ खाताना तो घाई घाईने खाऊ नये. आरामशीर बसून खावा. वेगाने आणि गडबडीत कोणताही पदार्थ तुम्ही खाल्लात. तर शरीराला तो पचवणं अवघड जाऊ शकतं.

Diwali Faral Recipe : दिवाळीचा फराळ बनवणं अवघड वाटतं? पाहा या सोप्या रेसिपी, सहज होईल काम

- शेवटचे पण सर्वात महत्वाचे. तुम्ही जे काही खात असाल, मिठाई असो की फराळाचे इतर पदार्थ. ते पूर्ण मनापासून आणि त्याचा आनंद घेत खा. टेन्शन घेत किंवा तो पदार्थ खाल्यानंतर मग तो बाहेर काढण्यासाठी डिटॉक्सचा विचार करत खाऊ नका.

संबंधित बातम्या

दिवाळीत सर्वजण आनंदी आणि समाधानी असणं आवश्यक आहे. अनेकांना मिठाई खूप आवडते. काहींना आवडत नाही. पण तरीही दिवाळीत मिठाईला शक्यतो कुणी नाही म्हणत नाही. मिठाई नक्की खा. मात्र या पद्धतीं वापरून बघा आणि काळजी घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या