JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहिती आहे का? वाचा सविस्तर 

Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहिती आहे का? वाचा सविस्तर 

एखाद्या पार्टीमध्ये बिअर पिण्याचा आग्रह अनेकदा तुम्हाला केला जात असेल. मात्र, बिअरचा ग्लास हातात घेण्यापूर्वी बिअर तुमच्या शरीरात गेल्यामुळे आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात, याचा विचार करणेही गरजेचे आहे.

जाहिरात

मद्यपानामुळे थंडी कमी होते, असं यामागचं कारण सांगितलं जातं. परंतु, हिवाळ्यात (Winter) मद्यपान हे घातक ठरू शकतं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : दारू पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही, असं आपल्याला सातत्यानी सांगण्यात येत असतं. लहानपणापासून तसं शिकवलंही जातं. पण अनेकदा एखाद्या पार्टीत दारू किंवा बिअर (beer) पिण्याचा आग्रह मित्रांकडून केला जातो. बिअर शरीरासाठी किती फायदेशीर आहे, हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात. मात्र, बिअर पिणं हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का ? मित्रमंडळीकडून किंवा एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही अनेकदा बिअरबद्दल ऐकले असेल की, ही फक्त बिअर आहे, ती घेतल्यामुळे काहीच होत नाही. याचाच अर्थ बिअर आरोग्यासाठी हानिकारक मानली जात नाही आणि तिचे सेवन अनेकजण करतात. मात्र, तसं अजिबात नाही. कारण बिअरमध्ये अल्कोहोलही (alcohol) असतं आणि ते आपल्या शरीराला खूप नुकसान करते. बिअरदेखील यकृतापासून (liver) मेंदूवर परिणाम (affect the brain) करणारी ठरते. जेव्हा तुम्ही एक ग्लास बिअर पिता, तेव्हा तुमच्या शरीराला कसं नुकसान (harms your body) होतं, हे जाणून घेऊयात. वाचा :  ऐन तिशीतल्या तरुणांमध्येही Heart Attack चं प्रमाण वाढतंय; जाणूऩ घ्या त्याची कारणं बिअर घेतल्यानंतर ती थेट लहान आतड्यात पोहोचते. यानंतर बिअरमध्ये असलेलं अल्कोहोल रक्तात जातं. एकदा अल्कोहोल रक्तात शिरल्यावर, हे अल्कोहोल रक्तातून शरीराच्या इतर पेशींपर्यंत पोहोचतं. यानंतर, हे अल्कोहोल पोषक घटकांना पेशींमध्ये विरघळण्यापासून रोखतं. पुढे ते यकृतापर्यंतही पोहोचतं. यानंतर अल्कोहोल मेंदूपर्यंत पोहचते आणि तुमच्या बोलण्यावरील नियंत्रण सुटू लागतं. दारू पिणारी व्यक्ती शरीरात जास्त प्रमाणात अल्कोहोल गेल्यामुळे काहीही बोलू लागते. त्यामुळे दररोज एकापेक्षा जास्त बिअर पिणं हे धोकादायक ठरू शकतं. कारण आपलं शरीर जास्त अल्कोहोल पचवू शकत नाही. वाचा :  मानसिक आरोग्य चांगलं राखायचंय? या 3 गोष्टी नक्की करा अल्कोहोलचा यकृतावर सर्वात मोठा परिणाम होतो. कारण ते यकृतात नव्या पेशी तयार करू लागते, आणि त्या मूळ यकृत पेशींची जागा घेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे मग यकृतामध्ये चरबीचे प्रमाण जास्त होते आणि ते व्यवस्थित काम करू शकत नाही. यकृतामध्ये बिघाड झाल्यानंतर अनेकजण दारू बंद करतात. त्यामुळे यकृतामध्ये थोडी फार सुधारणा होण्यास मदत होते. परंतु ते पूर्वीसारखे कार्य करू शकत नाही. त्यामुळे दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे तितकंच बिअर पिणंही. एखाद्या पार्टीमध्ये बिअर पिण्याचा आग्रह अनेकदा तुम्हाला केला जात असेल. मात्र, बिअरचा ग्लास हातात घेण्यापूर्वी बिअर तुमच्या शरीरात गेल्यामुळे आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात, याचा विचार करणेही गरजेचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या