JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तुम्हालाही आहेत का सकाळच्या या वाईट सवयी? वजन वाढत राहायला त्याच कारणीभूत

तुम्हालाही आहेत का सकाळच्या या वाईट सवयी? वजन वाढत राहायला त्याच कारणीभूत

वजन वाढीला आपल्या आयुष्यातल्या काही सवयीच कारणीभूत असतात. सकाळी उठल्यावर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असलो तर, त्याने वजनवाढीची समस्या निर्माण होते.

जाहिरात

वजन वाढण्याची कारणे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : आजच्या काळात वजन वाढणे ही सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. स्थूल शरीरामुळे आजारही येतात आणि आत्मविश्वासावरही परिणाम होतो. आवडीचे कपडे घालता येत नाहीत. एकाच ठिकाणी बसून काम करणं, शारीराची हालचाल कमी असणं, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काहीजण वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. भविष्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. कितीतरी जणांना वाटतं की, आपण सडपातळ असावं. वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. डॉक्टरांची औषधं, सल्ले ऐकतात. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. व्यायाम करातात, जॉगिंग करतात. पण, वजन आटोक्यात येत नाही. वजन वाढीला आपल्या आयुष्यातल्या काही सवयीच कारणीभूत असतात. सकाळी उठल्यावर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असलो तर, त्याने वजनवाढीची समस्या निर्माण होते. वेळीच लक्ष न दिल्यास वजन वाढ परमनंट ठरू शकते. अशावेळेस काय करावं हे समजत नाही. पण, आपल्या रोजच्या काही सवयी बदलूनही आपण वजन नियंत्रणात ठेऊ शकतो. त्यातही सकाळी उठल्यावर आपण काय करतो ? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजेच हल्दी राहण्यासाठी हेल्दी सवयी लावायला हव्यात. त्यातही सकाळी उठल्यावर आपण काय करतो याकडे लक्ष द्यायला हवं आणि त्या चुकीच्या सवयी बदलायला हव्यात. सकाळी उठून पाणी प्या सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी प्या. कोमट प्याणी प्यायल्यानेही फायदा होतो. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणंही फायदेशीर आहे. पॅक्ड ज्युस काही जणांना सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये पॅक्ड ज्युस पिण्याची सवय असते. पॅक्ड ज्युस प्रोसेस केलेले असतात. त्यात प्रिझर्वेटीव्ह असल्याने याचा शरीराला कोणताही फायदा होत नाही. उलट नुकसान होते. त्या ऐवजी फेश ज्युस प्या.

धावपळ करत नाश्ता नोकरीला जाणाऱ्या लोकांना नाश्ता करण्याइतकाही वेळ नसतो. त्यामुळे काहीजण फार धावपळ करत नाश्ता करतात. त्यामुळे त्याचा कोणताही फायदा शरीराला होतं नाही. उलट मेटाबॉलिजम स्लो होतं. त्यामुळे कितीही गडबड असली तरी, थोडा वेळ काढून नाश्ता करा. नाश्ता न करता घारबाहेर पडणं टाळा. हे वाचा -  सतत चिडचिड करणं पडू शकतं महाग! पाहा मेंदू आणि हृदयावर कसा होतो परिणाम हाय कॅलरीज काही लोक जास्त खाऊन घराबाहेर पडतात. त्यातही पचायला जड पदार्थ खाल्याने त्यातून कॅलरीज वाढतात. जास्त कॅलरीचं अन्न सकाळी खाल्याने त्यामुळेही लठ्ठपणा येऊ शकतो. हे वाचा -  त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, तर आरोग्यासाठी वरदान आहे हे टेस्टी फळ बाहेरच खाणं घरामधून नाश्ता करून न निघाल्याने भूक लागल्यावर असे लोक बाहेरचं अन्न खातात. त्यात काही वेळेला जंकफूडही खाल्ले जाते. बाहेर मिळणारे पदार्थ चांगल्या तेलात बनवलेले असतीलच असे नाही. भूक लागल्यावर बिस्कीटांसारखे पदार्थही टाळा. यामध्ये जास्त प्रमाणात मैद्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे शक्यतो घरामधून खाऊन निघा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या