पणजी, 12 फेब्रुवारी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) शिवसेनेने आपला वचननामा (Shiv Sena manifesto) जाहीर केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते हा वचननामा जाहीर केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केलेल्या टीकेलाही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत एकटेच विरोधकांना काफी
आदित्य ठाकरे म्हणाले, मला असं वाटतं संजय राऊत हे एकटेच विरोधकांना काफी आहेत. पक्षाचं नेत्रृत्व ते इतर राज्यांतही करत असतात. सर्व ठिकाणी लढत असताना एक बुलंद आवाज म्हणून आमचे खासदार असतील, नेते, उपनेते आणि प्रत्येक शिवसैनिक संजय राऊत यांच्यासोबत उभा आहे आणि उभे राहतील.
Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत
आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं
गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं
गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क
Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय
संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
शिवसेनाच नाही तर संपूर्ण देश राऊतांच्या पाठीशी
आत्ता जे काही दडपशाहीचं राजकारण सुरू आहे, अन्याय होत आहे त्यात ते एकटे नाहीत तर संपूर्ण देशही संजय राऊत यांच्या पाठीशी आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
वाचा : सेना-भाजप युती? भाजपचे मुख्य प्रवक्ते अन् संजय राऊतांची गुप्तभेट, चर्चांना उधाण
शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, गूड गव्हर्नस साठी शिवसेना आवश्यक आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. फक्त आम्हीच नाही तर एनडीएच्या सर्व घटक पक्षांचा पाठीत खंजीर खपसला गेलांय. गोव्यात 10 वर्षे भाजपची सत्ता आहे. केंद्रात 7 वर्षे सत्ता आहे मग शाश्वत विकास का नाही झाला? आमच्यावर टीका करणाऱ्यांना आमची भीती का वाटतेय? आमच्यावर टीका करतायेत याचच अर्थ त्यांना आमची भीती वाटते. शिवसेनेनं जी मैत्री केली ती खुलेपणाने जपली आहे. शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो. आम्ही मैत्री जपणारे आहोत. त्यामुळे विश्वासाने काम करत आहोत.
वाचा : "राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे", शेलारांचा CMवर पलटवार
काय म्हणाले होते आशिष शेलार?
भाजप नेते आशिष शेलार यांनी काल (11 फेब्रुवारी 2022) पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांची गोव्यात भेट झाली. या भेटीचे फोटो समोर आले त्यात नाना पटोलेंच्या खांद्यावर संजय राऊत यांनी हात टाकल्याचं दिसत आहे. यावर आशिष शेलार म्हणाले, नाना पटोलेंनी थोडीच हात ठेवला आहे. संजय राऊत यांनी हात ठेवला आहे. जो भेटेल त्याच्यावर हात ठेवायला बघत आहेत. म्हणून वाईट वाटत आहे. राजकारणात अशी अवस्था येणं... कुणी माझ्या बाबात बोलत नाही, कुणी माझ्या समर्थनार्थ येत नाही, माझी बाजू मांडत नाही, अशी अतिशय वाईट अवस्था झालीय.
खासदार संजय राऊत यांच्या मदतीला ना स्वपक्षातील कोणी येत, ना सरकारमधील कोणी येत. त्यामुळे ते सध्या जो दिसेल त्याच्या खांद्यावर हात टाकत आहेत असंही आशिष शेलार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Aaditya thackeray, Election, Goa, Sanjay raut