मराठी बातम्या / बातम्या / goa / Goa Election: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारली

Goa Election: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारली

BJP candidates list for Goa Assembly Election 2022: भारतीय जनता पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.


पणजी, 20 जानेवारी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर (BJP release list of candidates) केली आहे. या यादीत एकूण 34 उमेदवारांची नावे आहेत. उमेदवारांच्या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याच्या नावाचा समावेश होणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज भाजपने जाहीर केलेल्या यादीत उत्पल पर्रिकर यांच्या नावाचा समावेश नाहीये. (BJP release names of 34 candidates for Goa Assembly Election 2022)

पणजी विधानसभा मतदारसंघातून आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी उत्पल पर्रिकर यांनी केली होती. मात्र, पणजी येथून भाजपने बाबुश मेन्सोरात यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर आता पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी अद्याप 6 जागांवरील उमेदवारांची भाजपने घोषणा केलेली नाहीये.

तुमच्या शहरातून (गोवा)

संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..

आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं

Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?

गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं

मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार

गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू

पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का

Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय

Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO

घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत

मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क

या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, पणजीत जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली आहे. उत्पल पर्रिकर आणि पर्रिकरांचा परिवाह हा आमचा आहे, ते आमचे जवळील आहेत. आम्ही उत्पल पर्रिकर यांना दोन जागांचा पर्याय दिला होता. त्या दोन जागांपैकी एका जागेला त्यांनी यापूर्वीच नकार दिला होता दुसऱ्या जागेच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. भाजपने पर्रिकरांच्या कुटुंबाचा नेहमीच सन्मान केला आहे.

वाचा : गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्लॅन फसला, काँग्रेसचा नकार

भाजपने एकूण 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी 9 उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे आहेत. भाजपने Sanquelim मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने गोव्यात गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासाचा पाढा वाचून दाखवला.

गोव्यात पुन्हा एकदा भाजपचाच विजय होईल आणि भाजपचीच सत्ता येईल असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोव्यात तृणमूल काँग्रेस नसल्यात जमा आहे. ते हिंदूविरोधी आणि जातीयवादी आहेत. यासोबतच आम आदमी पक्षावर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचा पक्ष खोटारडा आहे आणि गोव्यातील जनता त्याला नाकारेल.

वाचा : गोवा निवडणुकीत TMCचा गुंता वाढला; उमेदवारीबाबत पक्षाच्या निर्णयावर फालेरो नाराज

40 जागांच्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यात राष्ट्रवादी गोमंतक पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत झाली आहे मात्र, आता या निवडणुकीत टीएमसी आणि आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे ही लढत आणखी रंगतदार होईल.

First published: January 20, 2022, 13:01 IST
top videos
  • Pune News : पुणेकर कधीच हार मानत नाही! वयाच्या 59 व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा VIDEO
  • Ashadhi Wari 2023: अवघीच तीर्थे घडली एक वेळा.., संत तुकाराम महाराजांच्या वंशजांचा तरुणाईला संदेश, Video
  • Sangli News: नोकरी नाही, घेतल्या गाई; मयूर करतोय लाखोंची कमाई, Video
  • Mumbai News : पावसाळ्यात पाय जपण्यासाठी शूज हवेत? ‘या’ मार्केटमध्ये करा सर्वात स्वस्त खरेदी, Video
  • Dombivli News : लोक जिथे फेकत होते कचरा, तिथेच असं काही उभारलं की परिसर झाला स्वच्छ!
  • Tags:Assembly Election, BJP, Election, Goa

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स