मराठी बातम्या / बातम्या / goa / मुंबई NCBची गोव्यात छापेमारी; एका विदेशी महिलेसह दोघींना अटक, 25 किलो गांजा जप्त

मुंबई NCBची गोव्यात छापेमारी; एका विदेशी महिलेसह दोघींना अटक, 25 किलो गांजा जप्त

मुंबई एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (Mumbai ncb raid in Goa) केली आहे. अधिकाऱ्यांनी एका विदेशी महिलेसह दोघींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबई एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (Mumbai ncb raid in Goa) केली आहे. अधिकाऱ्यांनी एका विदेशी महिलेसह दोघींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पणजी, 21 जानेवारी: मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशात अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई एनसीबीने कोल्हापुरातील एका फार्म हाऊसवर छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. ही घटना ताजी असताना मुंबई एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (Mumbai NCB raid in Goa) केली आहे. मुंबई आणि गोवा एनसीबीने (Goa NCB) काल संयुक्तपणे उत्तर गोव्यातील अर्पोरा (Arpora) याठिकाणी छापेमारी केली आहे.

यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांना अटक केली (2 female drug peddler arrested) असून यांच्याकडून जवळपास 25 किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त केल्या (Seized 25 kg Cannabis and MDMA tablets) आहेत. अटक केलेल्या महिलांमध्ये एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोघींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघींनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी संयुक्तपणे करत आहेत.

हेही वाचा-भरपूर शिकला पण वाया गेला; कौमार्यभंगाच्या कारणातून पुण्यातील तरुणीचा अमेरिकेत छळ

तुमच्या शहरातून (गोवा)

मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क

घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत

गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू

Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO

पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का

गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं

संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..

मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार

Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?

Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय

आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबीच्या टीमने संयुक्तपणे काल जुना गोवा आणि उत्तर गोव्यातील बनस्तारीम आणि पोंडा याठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनसीबीने दोन महिला तस्करांना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी महिलांकडून पोलिसांनी 25 किलो गांजासह MDMA च्या काही टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमधील एक महिला विदेशी आहे.

हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना

आरोपी महिला तस्करांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी महिल्यांच्या चौकशीत अमली पदार्थाचं मोठं जाळं उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदेशी महिला कोणत्या देशाची आहे? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published: January 21, 2022, 10:32 IST
top videos
  • 50 लाखांचे पॅकेज असलेल्या सॅाफ्टवेअर इंजिनिअरने दिली UPSC ची परीक्षा, अखेर निकाल आला Video
  • Nagpur News : राजा शिवछत्रपतीच्या जयजयकारासह निघाली गडकिल्ल्यांची मिरवणूक, देशातील पहिल्याच प्रयोगाचा Video
  • Wardha News: बारावीत अपयश आलं तर निराश होऊ नका, एकदा अनुरागच्या संघर्षाची कहाणी ऐका, VIDEO
  • Solapur News : प्री वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा मराठा संघटनेचा निर्णय, पाहा काय दिलं कारण, Video
  • Solapur News : मुंबई-सोलापूर 'वंदे भारत' महाराष्ट्रात हिट, पाहा काय सांगते आकडेवारी Video
  • Tags:Crime news, Goa, Mumbai News, NCB

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स