JOIN US
मराठी बातम्या / Explainer / Nobel Prizes : सर्वांत प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांवरून का होतोय वाद?

Nobel Prizes : सर्वांत प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांवरून का होतोय वाद?

जो नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी जगभरातली तज्ज्ञ मंडळी आतुर असतात, तो घेण्यास आतापर्यंत केवळ दोन जणांनी नकार दिला आहे

जाहिरात

जो नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी जगभरातली तज्ज्ञ मंडळी आतुर असतात, तो घेण्यास आतापर्यंत केवळ दोन जणांनी नकार दिला आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. नोबेल पुरस्कार जगातील सर्वांत प्रतिष्ठित मानले जातात. नोबेल पुरस्कार दर वर्षी सहा श्रेणींमध्ये दिले जातात. त्यात साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र आणि शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. आतापर्यंत 8 भारतीय नागरिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. महात्मा गांधींना हा पुरस्कार मिळालेला नाही. भारताच्या कोणत्याच पंतप्रधानांनादेखील आजपर्यंत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही; मात्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः आश्चर्य व्यक्त करत ‘हा पुरस्कार मला कशासाठी’? असा प्रश्न विचारला होता. खरं तर हे जगातले सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार असल्याने त्यांची जेवढी चर्चा होते, विजेत्यांचा गौरव होतो, तेवढेच हे पुरस्कार वादातही राहतात. जगातले अनेक देश पुरस्काराबद्दलचे निर्णय घेणाऱ्या ज्युरीवरही प्रश्न उपस्थित करतात. तरीही गेल्या 121 वर्षांत नॉर्वेच्या या संस्थेने सर्व टीका आणि वादांना बगल देत आपले निर्णय जाहीर केले आहेत. या पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेवर बऱ्याचदा लिंगभेद, वर्णद्वेषाचे आरोप होतात. तसंच पुरस्कार समिती युरोसेंट्रिक असल्याचंही म्हटलं जातं. म्हणजेच ते फक्त युरोपवरच लक्ष केंद्रित करत असल्याची टीका होते. त्यामुळे हे पुरस्कार वादात सापडतात. सहा श्रेणींमध्ये दिले जातात पुरस्कार शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही झाला होता. दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात या पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली जातात. जगातले प्रमुख मानवाधिकार नेते, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखक अशा 6 श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात. या वर्षीचं शांततेचं पारितोषिक बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅलेस बिलियात्स्की, रशियाची मानवाधिकार संघटना ‘मेमोरियल’ आणि युक्रेनची मानवाधिकार संघटना ‘सिव्हिल लिबर्टीज’ यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आलं आहे. (Noble Prize 2022 : एका व्यक्तिसह दोन संस्थांना शांततेचं नोबेल पुरस्कार जाहीर, वाचा, कुणाचा झाला सम्मान?) पुरस्कार देणाऱ्या समितीवर अनेक आरोप यंदाचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नोबेल समितीने शांततेच्या क्षेत्रात हा पुरस्कार देताना मोठी डिप्लोमेसी केल्याचं आपण म्हणू शकतो. कारण भीषण युद्धाचा सामना करणाऱ्या युक्रेनला त्यांनी महत्त्व दिलंच; पण त्याच वेळी जगातली दुसरी महासत्ता म्हटल्या जाणाऱ्या रशियालाही त्यांनी नाराज केलं नाही. त्यामुळे पुरस्कार देणाऱ्या समितीवर राजकीय हेतूने प्रेरित, व्यक्तिनिष्ठ म्हणजेच वैयक्तिक पसंती लक्षात घेऊन विजेत्यांची निवड केल्याचा आरोप होत असतो. कधी-कधी या समित्या कामगिरीला मागे टाकून त्यांच्या आवडीनुसार विजेत्यांची निवड करतात, असंही म्हटलं जातं. यंदा 343 उमेदवार पुरस्कारासाठी होते मैदानात यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी 343 उमेदवार मैदानात होते. यासाठी जगभरातल्या 251 जणांनी वैयक्तिक आणि 92 संघटनांनी अर्ज केला होता. नोबेल पुरस्कारांपैकी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी खूप उत्सुकता पाहायला मिळते; मात्र बऱ्याचदा हा पुरस्कार वादात सापडतो. नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा होताच, नोबेल पारितोषिक समितीने आपल्या निवेदनात म्हटलंय, की ‘शांतता पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती आणि संस्था आपापल्या देशातील नागरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी अनेक वर्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या अधिकारासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी काम केलंय. त्यांनी युद्ध गुन्ह्यांचं आणि सत्तेच्या गैरवापराच्या प्रकरणांचं दस्तावेजीकरण करण्यासाठी चांगलं काम केलंय. ते शांतता आणि लोकशाहीसाठी नागरी समाजाचे महत्त्व दर्शवतात.’ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिले जातात. ते स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, इंजिनीअर आणि व्यापारी होते. ते समाजसेवकही होते. अविवाहित असलेल्या नोबेल यांनी वयाच्या 63व्या वर्षापर्यंत कमावलेल्या सगळ्या संपत्तीच्या पैशातून दर वर्षी नोबेल पारितोषिक सुरू केलं जावं, असं एक इच्छापत्र लिहून दिलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी या पुरस्कारांची सुरुवात झाली आणि ते आजतागायत सुरू आहेत. (गणितात नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे ‘लव्ह अँगल’; प्रेयसीसोबत अफेअर असल्याचा राग?) अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या हयातीत 355 पेटंट्स घेऊन विज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान केलं. नोबेल यांचा सर्वांत महत्त्वाचा शोध डायनामाइटचा होता. डायनामाइट हे नायट्रोग्लिसरीनची स्फोटक शक्ती वापरण्याचं सुरक्षित आणि सोपं साधन होतं. 1867 मध्ये याचं पेटंट घेण्यात आलं होतं. परंतु लवकरच ते जगभरातल्या खाणकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वांत जास्त वापरलं जाणारं साधन बनलं. त्याचा वापर भारतासह अनेक देश करतात. पुरस्कार स्वीकारण्यास नकार देणारे ‘ते’ दोघं जो नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी जगभरातली तज्ज्ञ मंडळी आतुर असतात, तो घेण्यास आतापर्यंत केवळ दोन जणांनी नकार दिला आहे. ते आहेत एक फ्रेंच लेखक जॉन-पॉल सात्र आणि दुसरे व्हिएतनामचे नेते ले डुत टो. याशिवाय चार जणांना त्यांच्या देशाने पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी दिली नव्हती. पुरस्काराचं स्वरूप या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्हासह 10 मिलीयन स्वीडिश क्रोना म्हणजेच 9 लाख 11 हजार यूएस डॉलर्स एवढी रक्कम दिली जाते. एकाच श्रेणीतले एकापेक्षा जास्त विजेते असल्यास, बक्षीस रक्कम समान प्रमाणात विभागली जाते. हे पुरस्कार दर वर्षी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबर रोजी दिले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या