प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 24 जून : विचार करा की तुम्ही अनोळख्या ठिकाणी झोपलेले आहात आणि अचानक कोणीतरी तुमचा पाय चाटू लागल्याचं तुम्हाला झोपेत कळलं. अशावेळी तुमची काय अवस्था होईल? हा क्षण खरोखरंच अंगावर काटा आणणारा आहे. याबद्दल विचार करुन देखील तुम्हाला विचित्र वाटतंय मग तर विचार करा की त्या व्यक्तीसोबत काय घडलं असेल? एक सोशल मीडियावर प्रकरण समोर आलं, जे ऐकल्यावर त्यावर नेटीझन्सने जोरदार कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. नुकतेच अमेरिकेतील टेनेसी येथील एका हॉटेलच्या खोलीत मध्यरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता तेथील मॅनेजर घुसला आणि त्याने त्या व्यक्तीच्या पायाचे बोट चोखण्यास किंवा चाटण्यास सुरुवात केली. आपल्या खोलीत कोणीतरी असल्याचे लक्षात येताच त्याने पटकन लाईट लावली. यानंतर तो रागाने ओरडत खोलीतून निघून गेला. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? घटना साऊथ हिल्टन हॉटेलची आहे. 30 मार्च रोजी येथे एक विचित्र घटना घडली. हॉटेलमध्ये चेक इन केलेल्या एका व्यक्तीने पहाटे पाच वाजता हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हॉटेल व्यवस्थापकाने त्याच्या परवानगीशिवाय खोलीत प्रवेश केल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. यानंतर तो झोपलेल्या व्यक्तीच्या पायाचे बोट चाटत होता. हॉटेलचे नाईट मॅनेजर डेव्हिड नील यांच्यावर हा आरोप लावण्यात आला. त्यानंतर ५ मे रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मॅनेजर डेव्हिड नीलने डुप्लिकेट की कार्डच्या सहाय्याने त्या व्यक्तीच्या खोलीत एंट्री घेतली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पीटरला कोणीतरी आपल्या पायाचे बोट चोखत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्याने लाईट लावली. त्याने लगेच नीलला ओळखले. आदल्या रात्री तो मॅनेजरला भेटला होता. यानंतर त्याचे भान हरपले. त्याने ताबडतोब आपले कपडे उचलले आणि ओरडत खोलीबाहेर पळाला. तरुणींना हॉटेल रुममध्ये दिसली धक्कादायक गोष्ट, पाहून सरकली पायाखालची जमीन अटक केल्यानंतर मॅनेजरने सांगितले की, त्याला खोलीतून सिगारेटचा वास येत होता. ज्यामुळे तो खोलीत गेला. पण त्याने या व्यक्तीसोबत कोणतंही गैरव्यवहार केला नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत आणि याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.