JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सरू आजींनी अश्लील शिव्या घातल्या? व्हायरल व्हिडीओमुळे ‘देवमाणूस’वर बंदीची मागणी

सरू आजींनी अश्लील शिव्या घातल्या? व्हायरल व्हिडीओमुळे ‘देवमाणूस’वर बंदीची मागणी

झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 जुलै**:** देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूस ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र असं असताना देखील ही मालिका त्यातील एका डायलॉगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. (Devmanus Controversy) सरू आजींनी (Saru Aaji) उच्चारलेला एक डायलॉग प्रेक्षकांना रूचला नाही. त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे तक्रार केली. अखेर वाढत्या तक्रारीमुळे झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर यांनी स्वत: माध्यमांशी संवाद साधत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘देवमाणूस’..टोण्याची प्रेमप्रकरणं; VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू नेमकं प्रकरण काय आहे**?** मालिकेतील सरू आजी या आपल्या म्हणींसाठी प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या म्हणींच्या माध्यमातूनच इतरांवर टीका करताना दिसतात. अलिकडेच 13 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या एका भागात त्यांनी ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी….’ अशी एक म्हण उच्चारली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये आंघोळीला चोरी यानंतर आणखी एक शब्द त्यांनी उच्चारलेला दिसत होता. या शब्दामुळे अश्लील संभाषणाचे आरोप देवमाणूस मालिकेवर केले जात होते. त्यानंतर काही तासांत टीकेची झोड वाढली. परिणामी वाहिनीला प्रेक्षकांची माफी मागावी लागली. Samantar नं रचला इतिहास; पहिल्यांदाच मराठी वेब सीरिजनं नोंदवला विक्रम प्रेक्षकांनी आणि नेटकऱ्यांनी टीका केल्याचे पाहताच वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे. झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, “हा खोडसरपणा आहे. वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अश्लील शब्द वापरला गेल्याचा दाव नेटकरी करत आहेत. एक जबाबदार वाहिनी म्हणून आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील शब्द किंवा संवादाचा वापर केला नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये; हे तपासण्यासाठी आमची एक वेगळी टीम काम करत असते. तसंच ज्यांच्या तोंडी हा संवाद आहे; त्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत; त्या अशाप्रकारचा संवाद मुळात स्वत: बोलणारच नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर जे बोललं जात आहे ते चुकीचं आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या