JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘अग्गबाई सुनबाई’मध्ये मोठा ट्विस्ट; शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती

‘अग्गबाई सुनबाई’मध्ये मोठा ट्विस्ट; शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती

शुभ्राच्या (Shubhra) आयुष्यात नवी व्यक्ती येणार आहे. त्यामुळे आता मालिकेच्या प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 मे : झी मराठी (Zee Marathi) वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘अग्गबाई सुनबाई’ (Aggabai Sunbai)  मध्ये दिवसेन् दिवस नवीन ट्वीस्ट पहायला मिळत आहेत. तर सोहमच (Soham) नवं रुपही समोर येत आहे. पण या सगळ्या अडचनींत शुभ्राच्याही (Shubhra) आयुष्यात नवी व्यक्ती येणार आहे. त्यामुळे आता मालिकेच्या प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मालिकेचे पहिले पर्व प्रेक्षकांना फारच आवडलं होतं. तर उद्धत बबड्याचा म्हणजेच सोहमचा सगळेच तिरस्कार करायचे. अखेर हुशार, सहनशील शुभ्राने त्याला धडा शिकवला होता. तर आता मालिकेचं दुसरं पर्व म्हणजेच सुनबाई पर्व सुरु झालं आहे. काही पात्रांचे कलाकार बदलले असले तरीही आसावरी आणि अभिजीत राजेंच पात्र अभिनेत्री निवेदिता जोशी- सराफ आणि गिरीष ओक हेच साकारत आहेत.

या पर्वात शुभ्रा ही एका मुलाची आई झाली आहे. तर पूर्वीच्या शुभ्रापेक्षा ती आता सौम्य झालेली दिसते. तर ऐन लग्नाच्या वाढदिवशी तिला सोहमचे सगळे प्रताप समजले आहेत. सोहमचं तिच्यावर प्रेम नसून सुझेनवर प्रेम आहे व तो तिच्याशी प्रेमाचं खोटं नाटक करतोय हे ही आता शुभ्राच्या लक्षात आलं आहे. तर सोहम आणि सुझेनला तिने एकत्रही पाहिलं त्यामुळे शुभ्रावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

महाराष्ट्राबाहेर शूटिंग करताना काय त्रास होतो? मयुरी देशमुखनं सांगितला लॉकडाऊनमधील अनुभव

 सोहम आपल्याशी खोटं वागतोय तसेच तिच्यासोबत घरातील सगळ्यांनाच तो फसवतोय हे लक्षात आल्याने शुभ्राला मोठा धक्का बसतो. त्यामुळे ती खूप निराश होते आणि त्याच निराशेच्या भरात ती आत्महत्या करण्याचा विचार करते. तेव्हाच तिच्यासमोर ‘अनुराग गोखले’ नावाची व्यक्ती येते. आता हा अनुराग शुभ्राच्या आयुष्यात नक्की काय बदल घडवणार. तर या कठीण संकटातून तिला बाहेर काढणार का हे पाहण औत्सुक्याचं ठरेल. अभिनेता चिन्मय उद्गीरकर हा अनुराग गोखले ही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांनंतर चिन्मय पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहे. यापुर्वी नांदा सौख्य भरे या मालिकेत तो दिसला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या