मुंबई, 01 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यापासून तिच्यात आणि अल्लाहच्या मार्गात फार अंतर आल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं. आता तिला धर्म आणि शांतीसाठी बॉलिवूडला अलविदा म्हणायचे आहे. दरम्यान आम्ही या प्रकरणात झायरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता तिच्या मॅनेजरने न्यूज१८ इंडियाला यासंबंधीत माहिती देत म्हटलं की, झायराचं अकाउंट हॅक झालं असून तिचं अकाउंट कोणी हॅक करून कोणी ही पोस्ट लिहिली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आई मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्यावर मुलगा अरहानने दिली अशी रिअॅक्शन दरम्यान, आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमने ३० जूनला इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहित, बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. झायरानं नुकतंच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिलं. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
अनेकांनी तिला या निर्णयावरून ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यांनी झायराच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? तिला तिच्या इच्छेनुसार जगण्याचा पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’ स्मोकिंग करताना दिसला नवरा करण सिंग ग्रोवर, बिपाशा म्हणाली… झायरानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन झायरानं हा निर्णय घेतला आहे का? अशी शंका उपस्थित केली आहे. झायरानं तिच्या या पोस्टमध्ये कुराणमधील वेगवेगळे संदर्भ दिले आहेत. या क्षेत्राचा रस्ता मला अल्लाह पासून दूर करत आहे असंही झायराचं म्हणणं आहे. दंगल सिनेमाच्या वेळी झायराचा लुक समोर आल्यावर मुस्लीम कट्टरवाद्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व इस्लामच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यावेळी धमक्यांना न घाबरता काम करणाऱ्या झायरा वसिमनं आज मात्र धर्माचं कारण देत अभियनातूनच एक्झिट घेत असल्याचं जाहीर केल्यानं तिच्या या कृतीवर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाला टीव्ही शोमधील बाथटब रोमान्स, पाहा VIDEO याशिवाय झायरा सोशल मीडियावरील तिचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. लवकरच ती ‘द स्काय इडज पिंक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असू तिच्या व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्याही या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केलं असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO