JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ज्याच्यासमोर आणि बरोबर वाट्टेल तसं व्यक्त होता येतं', अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा VIDEO चर्चेत

'ज्याच्यासमोर आणि बरोबर वाट्टेल तसं व्यक्त होता येतं', अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा VIDEO चर्चेत

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ( Urmila Nimbalkar) नुकतीच आई झाली आहे. आई बाबा उर्मिला- सुकीर्त (Urmila Sukit) यांच्यात आजही प्रचंड प्रेम आहे. दोघांचं बॉडिंग किती खास आणि मस्त आहे हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात

'ज्याच्यासमोर आणि बरोबर वाट्टेल तसं व्यक्त होता येतं', अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा VIDEO चर्चेत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून:  अभिनेत्री उर्मिला ( Urmila Nimbalkar) आणि आताची मराठी युट्यूब उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मराठी काँटेंट क्रिएटर असल्यानं सोशल मीडियाच्या जगात उर्मिलाची मोठी फॅन फॉलोविंग आहे. उर्मिला एक उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय ती सूकिर्तची (Sukirt) स्वावलंबी बायको देखील आहे. सूकिर्त आणि उर्मिला यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे.  दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच लक्ष वेधून घेतात. सध्या दोघांच्या धम्माल डान्सचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्यांचा धम्माल डान्स पाहून चाहत्यांना हसू कोसळलं आहे.  त्याचप्रमामे दोघांनी लिहिलेलं कॅप्शनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुकीर्त आणि उर्मिला दोघेही आता आई बाबा झालेत. पण असलं तरी दोघांमधली मस्तीखोरपणा आणि वेडेपणा कमी झालेला नाही. दोघे आजही नवीन लग्न झाल्याप्रमाणे, कॉलेजमध्ये एकत्र मस्ती करणाऱ्या मित्र मैत्रिणींसारखेच राहतात. नुकताच दोघांनी एकत्र धम्माल डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर लिहिलेली पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे. उर्मिलाची भाची उन्मनी हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत उर्मिला आणि सुकीर्त यांनी हा धम्माल डान्स केलाय.

संबंधित बातम्या

दोघांनी लिहिलंय, ‘ज्याच्यासमोर आणि बरोबर वाट्टेल तसं व्यक्त होता येतं, मग ते मनातलं सगळं शेअर करण्यापासून ते अगदी विचित्र पद्धतीनं डान्स करण्यापर्यंत असेल, तोच खरा पार्टनर’, असं भन्नाट कॅप्शन आणि व्हिडीओ पाहून सर्वांनाच हसू कोसळलं आहे. हेही वाचा - ‘सर्व कुटुंबाला न्यायलयीन कारवाहीला तोंड द्यावे…’ अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत उर्मिला आणि सुकीर्त यांच्यात किती कमाल रिलेशन आहे याचा अंदाज येतोय.  दोघेही व्हिडीओत ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ गाण्यावर डान्स करत आहे. उर्मिलाची पतंग उडवण्याची हटके स्टाइल पाहून तर तिचे चाहते हसून हसून लाल झालेत. दोघांचा व्हिडीओ पाहून ‘सगळ्यांना असाच लाईफ पार्टनर मिळो’, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.  तर अनेकांनी कॅप्शनचं ही कौतुक केलंय. ‘तुमचा डान्स पाहून दिवसभराचा थकवा गेला’, असंही एका युझरनं म्हटलं आहे. इतकं भारी नाचतेस तू, आम्हाला माहिती नव्हतं, असं उर्मिलाच्या एका चाहत्यानं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या