मुंबई 2 जुलै**:** प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम विरोधात सक्तवसूली संचलनालयाने (ED) समन्स जारी केलं आहे. परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. यामीनं काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. हा गैरव्यवहार तिनं कुठल्या व्यवहारात केला याबद्दल अद्याप कुठलीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. परंतु या प्रकरणी यामी विरोधात हे दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही तर तिला अटकही केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘40 वर्षांच्या करिअरमध्ये 600 अॅक्शन सीन’; शरत सस्केनांनी सांगितला 12 सर्जरीचा अनुभव
एक वडापाव खाऊन काढायची दिवस’; Article 15 फेम अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास यामी गौतम सध्या आपल्या लग्नामुळं चर्चेत आहे. तिनं दिग्दर्शक आदित्य धारसोबत लग्न केलं. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून अमाप यश मिळवणाऱ्या आदित्यने याआधी ‘काबूल एक्स्प्रेस’, ‘तेज’, ‘आक्रोश’सारख्या चित्रपटांसाठी गीतकार, पटकथाकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तर हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या यामीनेही गेल्या काही वर्षात अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. या दोघांच्या विवाहाची अचानक आलेली वार्ता त्यांच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरली होती.