JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ekta kapoor : 'तुमच्यामुळे देशातील तरुण वेगळ्या...'; एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं

Ekta kapoor : 'तुमच्यामुळे देशातील तरुण वेगळ्या...'; एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता त्यावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला पाहा.

जाहिरात

एकता कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.  बेगुसराय, बिहार येथील न्यायालयाने एकता कपूरच्या XXX या वेब सीरिजविरुद्ध अटक वॉरंट पाठवले होते.  एकतावर आरोप आहे की, तिने या वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीची आक्षेपार्ह प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला चांगलेच  फटकारले आहे. तिच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला तसेच पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज  सुनावणी झाली आहे. एकता कपूरवर OTT प्लॅटफॉर्म ‘ALT बालाजी’ वर प्रसारित झालेल्या वेब सिरीजमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘तुम्ही तरुणांना असा कंटेन्ट  दाखवून त्यांची मन दूषित करत आहेत. अशी चित्रे पाहून देशातील तरुण वेगळ्या मार्गाला लागू शकतात.’ हेही वाचा - BB16 : अखेर सलमान खानही हटला मागे; साजिद खान प्रकरणात उचललं कठोर पाऊल जर या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगायचं तर, हे संपूर्ण प्रकरण एकता कपूरच्या ‘ट्रिपल एक्स सीझन 2’ मधील काही दृश्यांबद्दल आहे. मालिकेच्या कथेत 2 सैनिकांच्या पत्नींची आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. कथेनुसार, सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपल्या कर्तव्यावर जातात, ते गेल्यानंतर दोघांच्या बायका इतर पुरुषांशी शारीरिक संबंध बनवतात.  6 जून 2020 रोजी माजी सैनिक शंभू कुमार यांच्या वतीने CGM न्यायालयात तक्रार पत्र दाखल करण्यात आले होते.

या मालिकांमुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होत असल्याचे शंभूशिवाय अनेक माजी सैनिकांचे मत आहे. अशा वेब सिरीज पाहिल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल. हे सर्व पाहून लोक प्रचंड संतापले आहेत. आता या वेब सीरिजबद्दल एकता  कपूरला कोर्टाने सुद्धा फटकारले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या