JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Pm Modi Biopic: पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार बॉलिवूडचा शेहनशाह? बायोपिकबद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा

Pm Modi Biopic: पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार बॉलिवूडचा शेहनशाह? बायोपिकबद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा

अमिताभ यांच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अमिताभ लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

जाहिरात

अमिताभ बच्चन-नरेंद्र मोदी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21  जुलै : अमिताभ बच्चन यांना शतकातील सुपरस्टार असं म्हटलं जातं. या सुपरस्टारनं आजवर अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. वयाच्या या टप्प्यावरही हा अभिनेता तरुणांइतकाच फिट असून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. 80 वर्षांचे अमिताभ आजही   चित्रपट आणि कौन बनेगा करोडपती सारख्या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात. आजकाल त्यांचा आगामी चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ (प्रोजेक्ट के) वर काम करत आहे. आता अमिताभ यांच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी  अपडेट समोर आली आहे. अमिताभ लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘परी’ सारखे चित्रपट केलेल्या निर्मात्या प्रेरणा अरोरा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक बनवणार आहेत.याच चित्रपटात निर्माते मोदींच्या भूमिकेसाठी अमिताभ यांच्या नावाचा विचार करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. झूमच्या रिपोर्टनुसार, प्रेरणाला पीएम मोदींवर चित्रपट बनवायचा आहे,  कारण ते भारतातील सर्वात डायनॅमिक, देखणे आणि सक्षम व्यक्तीमत्व आहे.  आणि या भूमिकेसाठी अमिताभ यांच्यापेक्षा चांगलं अजून दुसरं कोणीच असू शकत नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रेरणाने असेही सांगितले की तिला तिच्या चित्रपटात पंतप्रधानांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना कास्ट करायचे आहे, कारण पंतप्रधानांच्या उंचीला शोभेल असा अमिताभ यांच्यापेक्षा चांगला कोणी नाही. या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना प्रेरणाने सांगितले की, या बायोपिकमधून  नरेंद्र मोदींचा पंतप्रधान झाल्यानंतरचा प्रवास दाखवला जाणार आहे. Riteish Deshmukh: क्या बात! शिवरायांच्या भूमिकेत झळकणार रितेश देशमुख; जिनिलियानं केलं कन्फर्म या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील अनेक पैलूंचा समावेश करण्यात येईल. त्यात मोठ्या प्रमाणावर परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यापासून ते आर्थिक विकास घडवून आणणे, कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करणे आणि लसीच्या वितरणापर्यंत अशा अनेक गोष्टीत मोदींचा कसा सहभाग होता ते दाखवलं जाणार आहे. यादरम्यान प्रेरणाला पीएम मोदींवर आधीच एक बायोपिक बनवण्यात आला असून त्यात विवेक ओबेरॉयने पीएम मोदींची भूमिका साकारली आहे अशी माहिती देखील देण्यात आली. यावर प्रेरणा म्हणाली की, तिने तो चित्रपट पाहिला नाही, पण, माझा चित्रपट पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला पूर्ण न्याय देईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. आता अमिताभ यांना पीएम मोदींच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या