JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रशांत दामले का नाकारतात चित्रपटांच्या ऑफर? 20 वर्ष करतायेत रंगभूमीवर काम

प्रशांत दामले का नाकारतात चित्रपटांच्या ऑफर? 20 वर्ष करतायेत रंगभूमीवर काम

प्रशांत दामले चित्रपट किंवा मालिकांऐवजी मराठी नाटकांमध्येच का करतात काम?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 जुलै**:** प्रशांत दामले (Prashant Damle) हे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास गेली पाच दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. परंतु गेल्या काही काळात प्रामुख्याने गेली दोन दशकं ते चित्रपटांऐवजी केवळ रंगभूमीवरच काम करताना दिसत आहेत. (Prashant Damle Movie) खरं तर एक लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर येतात. मात्र तरी देखील कटाक्षाने ते केवळ रंगभूमीवरच झळकतात. (Prashant Damle Natak) काय आहे यामागे खरं कारण?… Pornography Case: राज कुंद्राच्या संकटात वाढ; पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत दामले यांनी चित्रपटांऐवजी रंगभूमीवर काम करण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “चित्रपट, मालिका यामध्ये भरपूर पैसे मिळतात. कदाचित प्रसिद्धी देखील भरपूर मिळते. परंतु माझं ते ध्येय नाही. मला रंगभूमीवरच काम करायला अधिक आवडतं. या ठिकाणी काम करताना मला मानसिक आनंद अधिक मिळतो. त्यामुळे आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर पैशांसोबतच मानसिक शांतता देखील महत्वाची असते. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी मी रंगभूमीवरच करिअर करण्याचा निर्णय घेतला.” गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने…’

प्रशांत दामले सध्या ‘तू म्हणशील तसं’ हे नव्या नाटकामध्ये काम करत आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत प्रसाद ओक, संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई हे देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओक याने केलं आहे. अदिती गौरव कुलकर्णी आणि गौरव कुलकर्णी असे दोघं लग्न करून सुखाचा संसार करत असतात. दोघेही फक्त नवरा बायको नसतात तर एकमेकांचे छान मित्र-मैत्रिण देखील असतात आणि म्हणूनच एकमेकांच्या सगळ्या सवयी, सगळे स्ट्रॉंग पॉईंट्स, सगळे विक पॉइंट एकमेकांना माहित असतात. अन् त्यातून घडणाऱ्या गंमती-जंमती या नाटकामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या