JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नाना पाटेकरांना 'A Wednesday' मध्ये का घेतलं नाही? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

नाना पाटेकरांना 'A Wednesday' मध्ये का घेतलं नाही? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

नानांऐवजी अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची निवड करण्यात आली. काय होतं यामागे खरं कारण?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जुलै: नाना पाटेकर (Nana Patekar) हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास गेली चार दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Nana Patekar Movie) आज नाना पाटेकर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. परंतु असं असताना देखील अ वेनस्डे (A Wednesday) या चित्रपटात त्यांना नाकारण्यात आलं. खरं तर यामागे अभिनय हे कारण नव्हतं. मात्र तरी देखील नानांऐवजी अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची निवड करण्यात आली. काय होतं यामागे खरं कारण? शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा; पाहा कारवाईचा Exclusive video अलिकडेच नानांनी ‘कोण होणार करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये जुने अनुभव शेअर करताना नानांनी अ वेनस्डेचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “अ वेनस्डेमधील भूमिका आधी मी करणार होतो. परंतु माझ्या जागी ती भूमिका नसीरला मिळाली. कारण मी सेटवर ओरडतो. मारतो अशा काही विचित्र गोष्टी दिग्दर्शक नीरज पांडेला समजल्या होत्या. काही विचित्र कल्पना आहेत आपल्याबद्दल. त्यामुळे ती भूमिका मला मिळाली नाही.” Raj Kundra नव्या अ‍ॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड; नाव ऐकून बसेल धक्का ही भूमिका नसीरुद्दीन शाह यांना साकारताना पाहून नानांना कसं वाटलं? यापुढे नाना म्हणाले, “नसीरने ती भूमिका उत्तमरित्या साकारली. नसीर आणि मी समकालीन आहोत. एखाद-दोन वर्षे इकडे-तिकडे असेल. नसीरला सगळ्या चांगल्या भूमिका मिळायच्या आणि मला त्याचा फार हेवा वाटायचा. माझ्यात काय असं नाही जे त्याच्यात आहे, असा मला प्रश्न पडायचा. पण नसीर माझ्यापेक्षा मोठा का, तर नाटक हा माझा छंद होता आणि नाटक हा त्याचा ध्यास होता, त्याचं जगणं होतं. त्यामुळे माझ्यात आणि नसीरमध्ये ही तफावत कायम राहणार. नसीर कायम वर राहणार आणि मी कायम खाली. हळूहळू आम्ही ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न करू पण तरीसुद्धा त्याच्या पातळीवर जाणं मला कठीण आहे”, असं नाना म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या