JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘रंग दे बसंतीमध्ये करायचं होतं काम, पण...’; फरहान अख्तरनं का दिला नकार?

‘रंग दे बसंतीमध्ये करायचं होतं काम, पण...’; फरहान अख्तरनं का दिला नकार?

फरहान अख्तरला मिळाली होती ‘रंग दे बसंतीची ऑफर’; या कारणसाठी दिला नकार

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 5 जुलै**:** आमिर खान (Aamir Khan) स्टारर रंग दे बसंती (Rang De Basanti) हा एक कल्ट क्सासिक चित्रपट म्हणून पाहिला जातो. या चित्रपटानं बॉक्स ऑफिस कमाई फारशी केली नाही. मात्र आमिरनं या चित्रपटाच्या निमित्तानं केलेल्या प्रयोगाची जगभरातील समिक्षकांनी दाद दिली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल खरं तर हा चित्रपट आधी फरहान अख्तरला (Farhan Akhtar) ऑफर करण्यात आला होता. त्याला चित्रपटाची पटकथा देखील आवडली होती. परंतु तरी देखील त्यानं राकेश ओमप्रकाश यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. परिणामी हा रोल पुढे आमिर खानच्या पारड्यात पडला. नेहा कक्कर होती नैराश्येत; ‘त्या’ घटनेनंतर करणार होती आत्महत्या फरहान अख्तरनं का दिला होता नकार**?** फरहाननं त्यावेळी दिल चाहता है या चित्रपटाचं दिग्दर्शन नुकतंच संपवलं होतं. शिवाय लक्ष या चित्रपटावर तो काम करत होता. अन् याच दरम्यान त्याला रंग दे बसंतीमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली होती. त्यानं चित्रपटाची पटकथा वाचली त्याला आवडली देखील. परंतु त्यानं आधीच एका चित्रपटात पैसे गुंतवले होते. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये तो मनापासून काम करु शकणार नाही असं त्याला वाटत होतं. त्यामुळं या चित्रपटाला न्याय देण्यासाठी दुसरा एखादा अभिनेता शोधावा असा सल्ला त्यानं राकेश ओमप्रकाश मेहरा यांना दिला. अन् त्यांनी देखील मग विषय न ताणता इतर अभिनेत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा किस्सा स्वत: राकेश ओमप्रकाश यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या