JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / महिमानं ब्रेस्ट कॅन्सरवर कुठे घेतले उपचार व कुणी केली मदत? Video शेअर करत म्हणाली....

महिमानं ब्रेस्ट कॅन्सरवर कुठे घेतले उपचार व कुणी केली मदत? Video शेअर करत म्हणाली....

अभिनेत्री महिमा चौधरीला गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होती. अशातच महिमानं एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जून : अभिनेत्री महिमा चौधरी हिला स्तनाचा कर्करोग (Mahima Chaudhary Breast Cancer) झाला आहे. अभिनेत्री गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होती. सध्या अभिनेत्रीने ब्रेस्ट कॅन्सरवर (Breast Cancer) यशस्वी मात केली आहे आणि ती पुन्हा आपल्या कामावर परतली आहे. अशातच महिमानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं तिला या आजारातून बाहेर येण्यास केलेल्या मदतीविषयी आभार मानले आहेत. तसेच तिनं कुठे उपचार घेतले याबद्दल देखील सांगितलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महिमानं शेअर केलेल्या  व्हिडिओमध्ये विग घातलेला दिसत आहे.  ती या व्हिडिओमध्य म्हणताना दिसत आहे की,  मी तुम्हा सर्वांचे आभार मानते,  ज्यांनी मला भरभरुन प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या. काहींनी माझा नंबर शोधून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मी वैयक्तिकरित्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर सर्वांना रिप्लाय देत आहे. मात्र तरीही या प्लॅटफाॅर्मच्या माध्यामातूनही सगळ्यांचे आभार मानते.

संबंधित बातम्या

महिमाने मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ज्यांनी तिच्यावर उपचार केले त्या सर्वांचे आभार मानले आहेत. येथील डॉक्टर, प्लास्टिक सर्जन, परिचारिका यांचे आभार मानले आहेत. तसेच महिमाने टीना अंबानी यांचे नाव घेऊन त्यांचे खास आभार मानले आहेत. आलिया-रणबीरनं कित्येक रात्री जागून काढल्या, शेवटी तो दिवस आला दरम्यान, महिमा गेल्या अनेक दिवसांपासून केसांचा विग    लाऊन फोटोशूट करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या या अवस्थेचा अंदाज नाही आला. आपण ब्रेस्ट कॅन्सरमधून मुक्त झाल्याची माहिती  तिनं अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत मिळून दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या