JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नाना पाटेकरांसोबत काम करायला 'या' सुपरस्टारनं दिलेला नकार; म्हणालेला 'तो खूप अशिक्षित...'

नाना पाटेकरांसोबत काम करायला 'या' सुपरस्टारनं दिलेला नकार; म्हणालेला 'तो खूप अशिक्षित...'

हिंदी चित्रपटसृष्टीचा एक असा सुपरस्टार होता जो नानांसोबत काम करायला कचरायचा. या अभिनेत्याची ओळख ‘धाकड’ अशी असली तरी नानांसोबत काम करायचं म्हटलं की त्याला धाकधूक वाटायची. कोण होता हा सुपरस्टार आणि काय होतं यामागचं कारण जाणून घ्या.

जाहिरात

चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमध्ये नाना पाटेकर यांचे नाव सामील आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमध्ये नाना पाटेकर यांचे नाव सामील आहे. नानांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रहार, यशवंत, अग्निसाक्षी, तिरंगा, क्रांतीवीर आणि वेलकम या चित्रपटांसह यापेक्षा जास्त यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  नाना पाटेकरांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवर देखील राज्य केलं. त्यांचे डायलॉग्स, दमदार अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीचा एक असा सुपरस्टार होता जो नानांसोबत काम करायला कचरायचा. या अभिनेत्याची ओळख ‘धाकड’ अशी असली तरी नानांसोबत काम करायचं म्हटलं की त्याला धाकधूक वाटायची. कोण होता हा सुपरस्टार आणि काय होतं यामागचं कारण जाणून घ्या. बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता जो त्याच्या काळातील सुपरस्टार होता. पडद्यावर डायलॉग डिलिव्हरीचा विषय असो किंवा पडद्यावरचा रॉबिन हिरो. त्याने डायलॉग बोलताच थिएटर्समध्ये लोक शिट्ट्या वाजवायचे, त्याच्या एंट्रीलाचं प्रेक्षकांच्या टाळ्या मिळायच्या. ‘जानी’ या आपल्या कॅचफ्रेजने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा राज कुमार हा अशा बोल्ड कलाकारांपैकी एक होता, जो आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिला. पण तुम्हाला माहित आहे का ‘धाकड’ अभिनेता नानांसोबत काम करायला घाबरायचा.

राज कुमार खऱ्या आयुष्यात खूप गर्विष्ठ आणि स्पष्टवक्ते होते. तोंडात जे यायचे ते कुणासमोरही बोलायला मागेपुढे पाहायचे नाहीत.ते समोरच्या माणसांच्या भावनांचा कधीच विचार करायचे नाहीत. त्यावेळी अनेक मोठमोठ्या कलाकारांना त्याच्या उद्दामपणाची भीती वाटत होती आणि त्यामुळेच त्यांनी त्याच्यासोबत काम करणे टाळले होते. पण राज कुमार स्वतः नानांसोबत काम करणं टाळायचे. Fathers Day 2023 : वडिलांच्याही एक पाऊल पुढे आहेत ‘हे’ स्टारकिड्स; हिट चित्रपट देऊन गाजवलं घराण्याचं नाव ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मेहुल कुमार त्याच्या ‘तिरंगा’ चित्रपटासाठी कलाकार शोधत होता. राज कुमारने याआधी मेहुलसोबत ‘जंगबाज’, ‘मरते दम तक’ सारख्या चित्रपटात काम केले होते. मेहुलने राज कुमारला एका भूमिकेसाठी आधीच साइन केले होते, परंतु दुसऱ्या भूमिकेसाठी नाना पाटेकरला साइन करायचे होते. ‘प्रहार’ चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून तो खूप खूश झाला. जेव्हा नानांना कळलं की राज कुमार चित्रपटात आहे. हे ऐकून त्याने चित्रपट करण्यास नकार दिला.  कसेबसे मेहुलने नानांची समजूत घातली आणि नाना तिरंगा चित्रपट करायला तयार झाले. पण, त्यांनी एक अट घातली की, जर राज कुमार त्यांना काही उलटसुलट बोलले किंवा काही हस्तक्षेप केला तर ते चित्रपट अर्धवट सोडून देतील.

जेव्हा राजना कळलं की त्यांना नानांसोबत काम करायचं आहे. तेव्हा त्यांनी यावर आक्षेप घेतला. ते निर्मात्याला म्हणाले, ‘तू नानाला चित्रपटात का घेतलंस, तो खूप अशिक्षित आहे. तुला दुसरं कोणी सापडलं नाही का?’ यानंतर मेहुलनं निर्मात्याला नानांची अट सांगितली. त्यानंतर राज कुमार यांनी संपूर्ण चित्रपटात नानांपासून अंतर राखणे योग्य मानले. दोन ‘धाकड’ स्टार असूनही ‘तिरंगा’ चित्रपट सहा महिन्यात पूर्ण झाला. ‘तिरंगा’ हा एक अॅक्शन थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. त्याची कथा केके सिंग यांनी लिहिली होती. हा 1993 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पाचवा भारतीय चित्रपट होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या