धर्मेंद्र
मुंबई, 06 मे : बॉलिवूडचा ‘हीमॅन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच धर्मेंद्र. हा अभिनेता त्याच्या करिअरसोबतच लव्ह लाईफमुळे कायम चर्चेत राहिला. लग्न होऊन मुलं झाल्यावरही तो पुन्हा एकदा प्रेमात पडला आणि प्रसिद्ध अभिनेत्रीशी सगळ्यांशी भांडून लग्नगाठ बांधली. समाजाचा विरोध झुगारून त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनीशी लग्न केले, त्यानंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या पहिल्या पत्नीची. तिला घटस्फोट न देता अभिनेत्याने दुसरं लग्न केलं. तेव्हा सगळ्यांनाच या प्रकारावर धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. पण त्यांनी आपल्या नवऱ्याचा दुसऱ्या लग्नावर दिलेली प्रतिक्रिया ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर देखील सोशल मीडियावर देओल कुटुंबातील इतर सुनांप्रमाणेच लाइम लाइटपासून दूर राहते. धर्मेंद्रच्या आयुष्यात हेमा मालिनी यांच्या एंट्रीनंतर त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या आयुष्यात नक्कीच वादळ आलं असेल, पण त्यांनी पत्नी म्हणून नेहमीच कर्तव्य बजावले. हा किस्सा ऐकून तुम्हालाही यावर विश्वास बसेल.
धर्मेंद्र 1954 मध्ये केवळ 19 वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे कुटुंबीयांच्या संमतीने प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. त्यांचे लग्न झाले आणि या जोडप्याने त्यानंतर चार मुलांना जन्म दिला. त्यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या, त्यांची नावे सनी देओल, बॉबी देओल, विजिता देओल आणि अजिता देओल होती. पण त्यानंतर धर्मेंद्र फिल्मी जगतात लोकप्रिय ठरू लागले. तेव्हाच सुंदर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि पती गमावण्याची भीती पहिल्या पत्नीला सतावू लागली. सैफ आधी सनी देओलच्या प्रेमात होती साराची आई; अभिनेत्याचं ‘ते’ गुपित समजताच तिने कायमचं तोडलं नातं धर्मेंद्रने प्रकाश कौर यांना हेमासोबतच्या लग्नाबद्दल सांगितले, पण ती कोणत्याही परिस्थितीत पतीला घटस्फोट देण्यास राजी नव्हती. प्रकाश राजी होत नव्हत्या आणि दुसरीकडे धर्मेंद्रने हेमाशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि प्रकाशला घटस्फोट न घेता हेमासोबत पुन्हा लग्न केले.त्यानंतर धर्मेंद्रवर लोकांनी इतकी टीका केली की त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हिला ते ऐकून खूप वाईट वाटले आणि तिने स्वतः धर्मेंद्रला पाठिंबा दिला.
1981 मध्ये ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, ‘कोणताही पुरुष माझ्याऐवजी हेमाला निवडेल, माझ्या पतीने चुकीचे असे काहीही केलेले नाही. माझ्या पतीला कोणी वाईट कसे म्हणू शकते. सर्व नायकांचे अफेअर्स असतात आणि ते दुसऱ्यांदा लग्न करत आहेत.’ असं म्हणत त्यांनी धर्मेंद्रचा बचाव केला होता. प्रकाश कौर यांनी आपली सवत हेमाबद्दलही मत व्यक्त केले होते. ती म्हणाली होती, ‘मी हेमालाही समजू शकते. ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मला माहीत आहे. हेमाच्या जागी मी असते तर हे कधीच केले नसते. एक स्त्री म्हणून मी हेमाच्या भावना समजू शकते, पण पत्नी आणि आई म्हणून मी हेमाच्या भावनांना न्याय देऊ शकत नाही.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.