Jeena Zaroori Hai: निधनाच्या 8 महिन्यानंतर सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 21 मे: बिग बॉस (Big Boss) विजेता आणि लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla Death ) त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या निधनाला 8 महिने उलटून गेले असले तरी त्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं (Sidharth Shukla Last Song) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘जिना जरुरी हैं’ ( Jeena Zaroori Hai) असं गाण्याचं नाव असून हे गाण ऐकून सिद्धार्थचे चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. अभिनेत्री दीपिका त्रिपाठी (Deepika Tripathi) गाण्यात सिद्धार्थची हिरोइन आहे. तसेच गाण्यात सिद्धार्थ शुक्लासोबत बिग बॉस स्पर्धक विशाल कोटियान (Vishal Kotian) देखील दिसत आहे. विशाल गाण्यात सिद्धार्थच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. विशाल बिग बॉस 15मध्ये असताना गाण्याविषयी म्हणाला होता, ‘मी जेव्हा बिग बॉसमधून बाहेर पडेन तेव्हा हे गाणं रिलीज होईल’. विशालच्या या वक्तव्यानंतर सिद्धार्थचे चाहते त्याचं शेवटचं गाणं पाहण्यासाठी वाट पाहत होते. गाण्यात सिद्धार्थच्या फोटोला हार घालत असतानाचा शॉर्ट घेण्यात आला आहे. हा शॉर्ट गाण्यात सर्वात भावूक करणार आहे. सिद्धार्थचं हे गाणं म्हणजे एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे. एका मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या दोन भावांची गोष्ट गाण्यात दाखवण्यात आली आहे. गाण्यात नेहमीप्रमाणे सिद्धार्थ शुक्लाची अनोखी स्टाइल, किलर स्माईल आणि त्याचा खराखुरा अभिनय पहायला मिळत आहे. गाणं रिलीज झाल्यापासून गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही तासात गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावरही गाणं व्हायरल होत आहे. चाहते पुन्हा एकदा सिद्धार्थच्या आठवणीत रमले आहेत. https://www.youtube.com/watch?v=guG5vvV8uXI 4 मिनिटे 29 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थवर अनेक सिन्स शुट करण्यात आले आहे. एका सीनमध्ये भिंतीवर लटकलेल्या सिद्धार्थच्या फोटोकडे पाहून दीपिका ढसाढसा रडताना दिसत आहे. सिद्धार्थचं हे शेवटचं गाणं पाहून त्याचे अनेक चाहते भावूक झालेत तर अनेकांना त्याचं हे गाणं आवडलेलं नाही. 2 सप्टेंबर2021 रोजी सिद्धार्थचा हार्ट अटॅकने अचानक मृत्यू झाला. त्याचं अचानक जाणं हे सर्वांसाठीच चटका लावून जाणारं होतं. सिद्धार्थच्या जाण्याचा सर्वात जास्त झटका हा त्यांची बेस्ट फ्रेंड आणि कथित गर्लफ्रेंड शेहनाज गिल हिला. शेहनाजला सांभाळणे देखील कठिण झाले होते. सिद्धार्थच्या निधनानंतर पुढील अनेक महिने शेहनाज गिलची चर्चा होती. मात्र आता शेहनाज त्यातून बाहेर आली असून तिच्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे.