JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video: पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा समोर आली मंदिरा बेदी; आईच्या सोबतीने स्वत:ला सावरतेय

Video: पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा समोर आली मंदिरा बेदी; आईच्या सोबतीने स्वत:ला सावरतेय

पतीच्या निधनानंतर कपड्यांपासून विविध कारणांसाठी मंदिरा बेदीला ट्रोल करण्यात आलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै: मंदिरा बेदीसाठी (Mandira Bedi) गेले काही दिवस नक्कीच अवघड ठरले असतील. पती राज कौशलचं 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने घरीच निधन झालं होतं. पतीच्या निधनाचं दु:ख सहन करणं मंदिरासाठी कठीण होते. राज याच पार्थिव शरीर जेव्हा स्मशानात आणण्यात आलं तेव्हा मंदिरादेखील सोबत होती. इतकच नाही तर मंदिराने पतीचं पार्थिवाला इतरांसोबत खांदा दिला. आता हळू हळू मंदिरा या दु:खातून स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे. रविवारी ती आईसोबत वॉक करताना दिसली. ती आईसोबत बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुलं आणि कुटुंबासाठी आता तिलाच त्यांचा आधार व्हावं लागणार असल्याने तिच्या वागणुकीत आत्मविश्वास दिसून येत होता. मंदिराला आता आई-बाबा या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. (Mandira Bedi’s husband Raj Kaushal dies of heart attack) पतीसोबतचे फोटो केले होते शेअर राजच्या निधनाच्या काही दिवसांनंतर मंदिराने इन्स्टाग्रामवरील आपल्या प्रोफाइल फोटो हटवून ब्लॅक बॅकग्राऊंड केलं होतं. त्यावेळी मंदिराने राजसोबतच्या काही आठवणी शेअर केल्या होत्या. हे फोटो शेअर करताना मंदिराता हार्ट ब्रेकचा इमोजी पोस्ट केला होता. हे ही वाचा- पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदी प्रथमच सोशल मीडियवर झाली व्यक्त

मंदिराला केलं होतं ट्रोल मंदिराने जेव्हा पतीच्या पार्थिवाला खांदा दिला आणि अंत्यसंस्कारासाठी मडकं पकडलं तेव्हा अनेकांनी तिला पाठिंबा दिला तर अनेकांनी तिच्यावर टीकाही केली. अनेकांनी तिने घातलेल्या कपड्यांवरुन ट्रोल केलं. पतीच्या अंत्यसंस्कारासाठी मंदिराने जीन्स आणि पँट घातल्यामुळेही तिला ट्रोल करण्यात आलं. मात्र अनेक सेलिब्रिटी मंदिरासाठी उभे राहिले आणि प्रतिक्रियांना प्रत्युत्तर दिलं.

कोण होते राज कौशल राज कौशल डायरेक्टर आणि प्रॉड्यूसर होते. त्यांनी 3 चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. एन्थनी कौन हौ, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या चित्रपटाचं राजने दिग्दर्शन केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या