मुंबई, 25 फेब्रुवारी : ‘राझी’, ‘संजू’ आणि ‘उरी’ या सिनेमांनंतर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा विकी कौशल मागच्या काही काळापासून अभिनेत्री कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर सुद्धा विकीचे चाहते कतरिनाला मिसेस कौशल म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा झी सिने अवॉर्डपासून सुरू झाल्या होत्या. या फंक्शनला हे दोघंही एकमेकांच्या हातात हात घालून पोहोचले होते. मात्र या दोघांनी यावर अद्याप मौन बाळगलेलं आहे. पण विकी कौशल कतरिनाला गुपचूप भेटत असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर कतरिना आणि विकीच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू असली तरीही या दोघांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकीनं प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरीही या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी नातं आहे. यासाठीच की काय विकी गुपचूप कतरिनाला भेटायला तिच्या घरी जात असतो आणि याची मीडियाला कल्पना सुद्धा नसते. विकी स्वतःला कोणीही ओळखू नये यासाठी पूर्ण काळजी घेतो. स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो हुडी आणि मास्कचा वापर करतो. किंग खानच्या लेकीची मित्रांसोबत धम्माल, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विकी कौशल म्हणाला होता की त्याला आता त्याची पर्सनल लाइफ गार्ड करायची आहे. कारण जर तो स्वतः याबद्दल काहीही बोलला तर अफवा आणि गैरसमज पसरतील. हेच नेमकं विकीला नको आहे. विकी म्हणाला, यातच भलं आहे की मी माझ्या पर्सनल लाइफ बद्दल थोडा सतर्क राहावं. त्यामुळे मी आता माझ्या लाइफबद्दल कोणतीच गोष्ट उघडपणे सांगणार नाही. श्वेता तिवारी सौंदर्याच्या बाबतीत स्वतःच्या मुलीलाच देतेय टक्कर, पाहा PHOTOS
विकीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘भूत’ सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं चांगली कमाई केली आहे. याशिवाय तो करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही दिसणार आहे. तर कतरिनाचा अक्षय कुमार सोबतचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीव्हीची ‘संस्कारी बहू’ झाली बोल्ड, शेअर केले बाथटबमधील PHOTOS