JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Actor Dharmendra health update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली? मुलगा बॉबी देओलने दिली महत्त्वाची माहिती

Actor Dharmendra health update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली? मुलगा बॉबी देओलने दिली महत्त्वाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे नाव आपल्यासाठी नवं नाही. बॉलिवूडमध्ये भलीमोठी कारकीर्द असलेल्या धर्मेंद्र जी यांच्या प्रकृतीशी निगडित येणाऱ्या नवनव्या बातम्यांमुळे सध्या खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र यांची तब्येत कशी आहे? त्याबद्दल एका मोठा खुलासा त्यांच्या मुलाने नुकताच केला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 6 जून: बॉलिवूडचे वीरू अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्या प्रकृती खालावली असल्याच्या नव्या बातमीने आज सकाळपासून कहर माजवला आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर नसून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दखल केलं आहे अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पण यात कितपत तथ्य आहे? धर्मेंद्र यांची प्रकृती नक्की कशी आहे? धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर (Veteran Actor Dharmendra Health Condition) असल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती असं सांगितलं जात आहे. त्यांना एप्रिल महिन्यात देखील पाठीच्या दुखापतीमुळे तात्काळ आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. सकाळपासूनच त्यांच्या आरोग्याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत होती. यावर त्यांचा मुलगा बॉबी देओलने वर्क अत्यंत महत्त्वाचा अपडेट दिला आहे.   बॉबी देओलने नक्की  काय सांगितलं? धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने धर्मेंद्र आजारी असल्याच्या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. बॉबीने धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल पसरलेल्या (Actor Dharmendra helath rumors) अफवांना पूर्णविराम देत हे सांगितलं की त्याच्या वडिलांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्यांना काही झालेलं नाही. इंडिया टुडे शी बोलताना बॉबीने हे स्पष्ट केलं की धर्मेंद्र यांची प्रकृती उत्तम आहे. तो असं म्हटला की, “माझ्या वडिलांची अर्थात धर्मेंद्र जी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या तब्येतीला काही झालं नाही. ते घरी आहेत, आराम करत आहेत आणि ते लवकरच पूर्ण बरे होतील” अशा खात्रीशीर शब्दात बॉबीने सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे.  

संबंधित बातम्या

आज सकाळची आलेल्या या बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना करत होते. बॉलिवूडच्या वीरूची तब्येत लवकर सुधारावी आणि ते सुखरूप असावे यासाठी सगळीकडून प्रार्थना केली जात आहे. धर्मेंद्र यांची तब्येत काही काळापूर्वी बरी नाही अशा बातम्या येत होत्या. एप्रिल महिन्यात त्यांना रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं. मात्र पूर्ण बरे झाल्यावर त्यांनी एका विडिओ मार्फ़त त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले होते.   हे ही वाचा-   Amruta Subhash News: “मायबाप प्रेक्षक, मी…” रसिकांसाठी अमृता सुभाषची खास पोस्ट

एका मोठ्या ब्रेकनंतर धर्मेंद्र जी करणं जोहरच्या ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहेत. धर्मेंद्र त्यांच्या दोन मुलांसह अर्थात सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासह ‘अपने 2’ चित्रपट दिसणार आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र यांचा नातू सुद्धा दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या