मुंबई, 12 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. उर्वशीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दावा केला होता की ‘आरपी’ नावाची व्यक्ती एकदा हॉटेलच्या लॉबीमध्ये अनेक तास तिची वाट पाहात होती. यानंतर ऋषभने सोशल मीडियावर अभिनेत्रीची खिल्ली उडवत एक पोस्ट शेअर केली होती. नंतर काही वेळातच त्याने ही पोस्ट डिलीटदेखील केली होती. परंतु आता अभिनेत्रीनेसुद्धा उत्तर देत एक नवी पोस्ट शेअर केली आहे. उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचा वाद फारच जुना आहे. हे दोघेही सतत एकमेकांना टोमणे देत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एकदा सांगितलं होतं की, ती क्रिकेटरला डेट करत आहे. ऋषभने ही गोष्ट फेटाळून लावली होती. त्यांनतर लगेचच त्याने अभिनेत्रीला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. ऋषभ आणि उर्वशी मुंबईत एकेठिकाणी एकत्र दिसून आले होते त्यांनतर त्यांच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं. उर्वशी रौतेला पोस्ट- ऋषभ पंतच्या पोस्टवर उत्तर देत उर्वशी रौतेलाने लिहलंय, ‘‘छोटू भैय्याने बॅट-बॉल खेळायला हवं. मी कोणतीही मुन्नी नाहीय, बदनाम व्हायला. यंग किड्डो डार्लिंग्स तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा’. असं म्हणत उर्वशीने ऋषभची फिरकी घेतली आहे. शिवाय अभिनेत्रीने अनेक हॅशटॅगसुद्धा वापरले आहेत. या दोन्ही सेलेब्रेटींमधील वाद वाढतच चालला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या चांगल्याच चर्चा सुरु आहेत. कुणी उर्वशीला स्पोर्ट करत आहेत तर कुणी ऋषभला स्पोर्ट करताना दिसून येत आहे. नेमकं काय घडलं होतं?- उर्वशीने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आपली कुणीतरी रात्रभर वाट पाहिल्याचं सांगितलं होतं. ती म्हणाली, ‘मी नवी दिल्लीत शूटिंग करत होते आणि रात्री पोहोचले. मला पटकन तयार व्हावं लागलं कारण अभिनेत्रींना तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
**(हे वाचा:** Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो का? दिग्दर्शकाने अखेर सोडलं मौन ) अभिनेत्रीने पुढं म्हटलं होतं, ‘मिस्टर आरपी हॉटेलच्या लॉबीमध्ये आले होते त्यांना मला भेटायचं होतं. दहा तास उलटून गेले होते आणि मी झोपी गेले होते. त्यामुळे मी एकही कॉल अटेंड करु शकले नाही. जेव्हा मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल्स दिसले आणि मला खूप वाईट वाटलं की, कोणीतरी माझी वाट पाहात आहे आणि मी त्यांना भेटू शकले नाही. मी त्यांना म्हटलं मुंबईला आल्यावर भेटू, भेटलोदेखील परंतु नंतर ड्रामा झाला होता. उर्वशीच्या या मुलाखतीनंतरतर ऋषभ आणि तिचा वाद पुन्हा एकदा वाढलेला दिसून येत आहे.